भर थंडीतही धावले चिमुकले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 25, 2017 12:56 PM2017-11-25T12:56:13+5:302017-11-25T12:56:26+5:30
घोटी : मुंबईमध्ये झालेल्या २६/११ च्या दहशवादी हल्ल्यात शहीद झालेल्या शूरविरांच्या स्मरणार्थ आयोजित तालुकास्तरीय ‘शहिद मॅरेथॉन’ स्पर्धेला उस्फूर्त प्रतिसाद मिळाला. संत गाडगेबाबा स्पोर्ट्स क्लब आयोजित या स्पर्धेत भर थंडीत चिमुकल्यांसह आबालवृद्धही धावले.

ही स्पर्धा उंबरकोन येथे ही स्पर्धा पार पडली.या स्पर्धेचे उदघाटन सैनिक भाऊसाहेब बोराडे, भगीरथ मराडे, घोटीचे सहाय्यक पोलीस निरीक्षक पंकज भालेराव, पांडुरंग शिंदे, रमेश शिंदे, धावपटू निलेश बोराडे यांच्या हस्ते ध्वज दाखवून झाले. ही स्पर्धा चार गटात पार पडली. यात लहान मुले गटात तुषार शिंदे, गणेश सारु कते, रोहित जोशी, लहान गट मुलीत कमल वाघ,कांचन शिंदे,गायत्री शिंदे, मोठा गट मुलात त्र्यंबक चिमटे, रोहित पारधी, छगन सारु कते, मोठा गट मुलीत अंजना पदमीरे, दुर्गा परसया, मनीषा शिंदे तर खुल्या गटात समाधान बिन्नर, सागर गोडे, प्रवीण बिन्नर, गोरख डोखे यांनी बाजी मारली.
स्पर्धा संपन्न झाल्यानंतर विजत्या स्पर्धकांना मान्यवरांच्या हस्ते बक्षीस वितरण करण्यात आले.स्पर्धा यशस्वीतेसाठी प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक आर.आर.मोरकर, शिक्षक एस.आर.सदगीर,जी.पी.कोळी,टी. टी. धोंगडे,आदींसह शिक्षक आणि ग्रामस्थानी सहकार्य केले.