बोरिवलीतून पथक दाखल; ‘त्या’ बिबट्याला बेशुध्द करण्याची मोहीम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 17, 2020 07:32 PM2020-06-17T19:32:27+5:302020-06-17T19:41:31+5:30

भगुर गावाजवळील दोनवाडे गावापासून ते थेट बाबळेश्वरपर्यंत गावकऱ्यांमध्ये बिबट्याची दहशत निर्माण झाली आहे. एकापाठोपाठ या भागातील विविध गावांमध्ये मनुष्यावर बिबट हल्ले होऊ लागल्याने घबराट पसरली.

Squad filing from Borivali; Campaign to anesthetize 'that' leopard begins | बोरिवलीतून पथक दाखल; ‘त्या’ बिबट्याला बेशुध्द करण्याची मोहीम

बोरिवलीतून पथक दाखल; ‘त्या’ बिबट्याला बेशुध्द करण्याची मोहीम

Next
ठळक मुद्देबोरिवलीचे पथक दारणाकाठावरदोनवाडे ते बाबळेश्वरपर्यंतच्या भागात मोहीम सुरूराज्याच्या वन व वन्यजीव विभागाचे लक्ष नाशिकच्या बिबट्याकडे अर्धा डझन ‘ट्रॅप कॅमेरे’

नाशिक : दारणा नदीच्या खोऱ्यात धुमाकूळ घालणा-या बिबट्याला जेरबंद करण्यासाठी वनविभागाने लावली ताकद पणाला. संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाचे पशुवैद्यकिय अधिकारी डॉ. शैलेश पेठे यांचा चमुदेखील नाशिक पश्चिम वनविभागाच्या रेस्क्यू टीमच्या मदतीला शहरात बुधवारी (दि.१७) दाखल झाला. या संपुर्ण भागात एकूण ८ पिंजरे तैनात करण्यात आले आहे.
भगुर गावाजवळील दोनवाडे गावापासून ते थेट बाबळेश्वरपर्यंत गावकऱ्यांमध्ये बिबट्याची दहशत निर्माण झाली आहे. एकापाठोपाठ या भागातील विविध गावांमध्ये मनुष्यावर बिबट हल्ले होऊ लागल्याने घबराट पसरली. बिबट्याच्या हल्ल्यात एप्रिलपासून आतापर्यंत एका चिमुकलीसह दोन मुले व एका वृध्दाचा बळी गेला आहे. तसेच दैव बलवत्तर म्हणून १० जून रोजी शेवगेदारणा शिवारात समृध्दी कासार या तीन वर्षाच्या चिमुकलीचे प्राण वाचले. बिबट्याने तिलाही पंजा मारून जखमी केले; मात्र जवळच असलेली तीची आजी गजराबाई या सावध असल्यामुळे त्यांनी बिबट हल्ला मोठ्या धाडसाने परतवून लावण्यास यश मिळविले आणि आपल्या नातीला वाचविले. घराच्या अंगणात खेळत असलेल्या गुंजन नेहेरे या बालिकेला बिबट्याने मंगळवारी (दि.१६) रात्री आठ वाजेच्या सुमारास झडप घालून ऊसशेतीत नेऊन ठार केल्याची घटना घडल्याने परिसरात अधिकच संताप व्यक्त होऊ लागला.

याप्रकरणी या भागातील लोकप्रतिनिधींकडूनदेखील हिंस्त्र बिबटचा तत्काळ बंदोबस्त करण्याची मागणी जोर धरू लागली. खासदार हेमंत गोडसे, आमदार सरोज अहिरे यांनी निवेदनाद्वारे तसेच प्रत्यक्षरित्या थेट वनमंत्री संजय राठोड यांच्याशी संपर्क साधून बिबट्याला तत्काळ जेरबंद करावे अथवा ठार मारावे, अशी संतप्त मागणी केली. यानंतर राज्याचे वन्यजीव विभागाचे प्रधान मुख्य वनसंरक्षक नितीन काकोडकर, अपर प्रधान मुख्य वनसंरक्षक (वन्यजीव) सुनील लिमये यांनीदेखील स्थानिक वरिष्ठ अधिका-यांना याबाबत सुचना देत तत्काळ बोरिवली येथून एका रेस्क्यू पथकाला स्थानिक पथकाच्या मदतीला पाचारण केले आहे. एकूणच आता संपुर्ण राज्याच्या वन व वन्यजीव विभागाचे लक्ष नाशिकच्या दारणाकाठालगतच्या बिबट्याकडे केंद्रीत झाले आहे. दोन्ही रेस्क्यू पथकांसह वरिष्ठ अधिका-यांनी बाबळेश्वर ते दोनवाडे या भागाचा पाहणीदौराही बुधवारी दुपारनंतर केला.

 

Web Title: Squad filing from Borivali; Campaign to anesthetize 'that' leopard begins

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.