एसआरएमुळे काही प्रमाणात शहर झोपडपट्टीमुक्त होण्यास मदत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 14, 2021 04:18 AM2021-09-14T04:18:36+5:302021-09-14T04:18:36+5:30
कोट... नाशिक शहरात मुंबई पुण्याच्या धर्तीवर एसआरए योजना लागू हात असेल तर त्याचे स्वागत आहे. क्रेडाईने यांसदर्भात यापूर्वी वेळोवेळी ...
कोट...
नाशिक शहरात मुंबई पुण्याच्या धर्तीवर एसआरए योजना लागू हात असेल तर त्याचे स्वागत आहे. क्रेडाईने यांसदर्भात यापूर्वी वेळोवेळी मागणी केली आहे शहरातील झोपडपट्टीवासीयांना त्यामुळे हक्काचे घर मिळेल आणि नियोजनबध्द शहरासाठी ते चांगले पाऊल ठरेल, अर्थात, शासनाने मुंबई- पुण्याच्या धर्तीवर अतिरिक्त एफएसआय मिळायला हवा. तरच या प्रकल्पाची व्यवहार्यता वाढेल.
रवि महाजन, अध्यक्ष, क्रेडाई मेट्रो.
कोट...
एसआरएची योजना चांगली आहे. मुंबई, पुण्याप्रमाणेच ती नाशिकला झाली तर खासगी भूखंडांवरील झेापडपट्ट्यांचा प्रश्न बऱ्यापैकी निकाली निघेल. आजपर्यंत शासकीय भूखंडांवरील झेापडपट्टीवासीयांना घरे मिळाली; परंतु खासगी भूखंडावरील रहिवाशांना मिळाले नाही ते मिळू शकतील. योजनेच्या अंमलबजावणीसाठी स्वंतत्र नियमावली तसेच प्राधिकरण असते. त्यामुळे कामे नियमानुसार होतात. अर्थात, शंभर टक्के झोपडपट्टीमुक्त शहर यामुळे हेाईल असे नाही; मात्र बऱ्यापैकी समस्या सुटेल.
- अविनाश शिरोडे, बांधकाम तज्ज्ञ.
कोट..
एसआरए योजना चांगली असली तरी ती सर्वच खासगी भूखंडांसाठी उपयुक्त ठरेल, असे सांगता येत नाही. मुंबई- ठाण्यात जमिनीचे भाव आणि बांधकाम खर्च (कंन्स्ट्रक्शन कॉस्ट) यात माेठी तफावत आहे नाशिकमध्ये तशी स्थिती नाही. त्यामुळे गंजमाळसारखे महामार्गालगतचे काही भूखंड उदाहरण म्हणून विचारत घेतले तर तेथे योजना यशस्वी होऊ शकेल; मात्र सर्वच ठिकाणी योजना व्यवहार्य ठरेल, असे नाही.
- गुरूमितसिंग बग्गा, ज्येष्ठ नगरसेवक.
कोट...
एसआरए स्कीम नाशिकमध्ये राबवल्यास त्याचे स्वागतच आहे; मात्र नाशिकला त्या मानाने अशा वसाहती फार मोठ्या आकारमानाच्या नाहीत. प्रत्येक स्कीम करता व्यावहारिकता तपासावी लागेल.
- अरूण काबरे, ज्येष्ठ वास्तुविशारद.