नाशिकमध्ये एसटीचा भीषण अपघात, महिला वाहकासह एका महिला प्रवाशाचा मृत्यू; अनेक जण जखमी

By ऑनलाइन लोकमत | Published: April 7, 2023 05:02 PM2023-04-07T17:02:38+5:302023-04-07T17:02:38+5:30

जखमींना तातडीनं नजिकच्या रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. मृत्यूचा आकडा वाढण्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे. 

ST accident in Nashik death of one female passenger along with female conductor Many injured | नाशिकमध्ये एसटीचा भीषण अपघात, महिला वाहकासह एका महिला प्रवाशाचा मृत्यू; अनेक जण जखमी

नाशिकमध्ये एसटीचा भीषण अपघात, महिला वाहकासह एका महिला प्रवाशाचा मृत्यू; अनेक जण जखमी

googlenewsNext

नाशिक-

नाशिक जिल्ह्यात देवळा मनमाड मार्गावर एसटीचा भीषण अपघात झाला आहे. या अपघातात महिला वाहकाचा जागीच मृत्यू झाला असून बसमधील एका महिला प्रवाशाचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. बसमधील अनेक प्रवासी जखमी असल्याची माहिती समोर आली आहे. जखमींना तातडीनं नजिकच्या रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. मृत्यूचा आकडा वाढण्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे. 

नाशिक जिल्ह्यात गेल्या काही महिन्यांत एसटी अपघाताच्या घटना समोर आल्या आहेत. मनमाड आगाराच्या बसला भीषण अपघात झाला. चांदवड शहराजवळील मतेवाडीजवळ हा भीषण अपघात झाला असून बसमधील २० ते २२ प्रवासी गंभीर जखमी झाल्याची प्राथमिक माहिती आहे. ही बस मनमाड आगारातून सुटून नांदुरीकडे गेली होती. तिकडून परतत असताना चांदवड शिवारातील मतेवाडीजवळ अपघात झाला. समोरुन येणाऱ्या वाहनानं कट मारल्यानंतर एसटीचा रॉड तुटल्यामुळे चालकाचे नियंत्रण सुटले आणि एसटी बस थेट समोरील झाडावर आदळून अपघात झाल्याचं सांगण्यात येत आहे. अपघातात सारिका लहिरे या महिला कंडक्टरचा जागीच मृत्यू झाला तर एका महिला प्रवाशाचा उपचारा दरम्यान मृत्यू झाला आहे.  

अपघात एवढा भीषण होता की, बसच्या एका बाजूचा चक्काचूर झाला आहे. या भीषण अपघातात महिला बस कंडक्टरचा जागीच मृत्यू झाला. तर काही प्रवासी गंभीर जखमी झाले आहेत. जखमींना तातडीने चांदवडच्या उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. यातील काही जखमींची प्रकृती गंभीर आहे. 

Web Title: ST accident in Nashik death of one female passenger along with female conductor Many injured

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Accidentअपघात