सप्तशृंग गडावरील घाटात एसटी बस कोसळली; १८ प्रवासी जखमी, पालकमंत्री घटनास्थळी रवाना
By ऑनलाइन लोकमत | Published: July 12, 2023 07:53 AM2023-07-12T07:53:25+5:302023-07-12T08:00:14+5:30
पालकमंत्री दादा भुसे हे मालेगावहून घटनास्थळी रवाना झाले आहेत.
- मनोज देवरे
कळवण ( नाशिक) : सप्तशृंग गडावरील घाटात एस. टी. बस कोसळून १८ प्रवासी जखमी झाले. आज सकाळी पावणे सातच्या सुमारास हा अपघात घडला. खामगाव डेपोची मुक्कामी बस अपघात ग्रस्त झाली. जखमी प्रवाशांवर वणी येथे उपचार सुरू आहेत. पालकमंत्री दादा भुसे हे मालेगावहून घटनास्थळी रवाना झाले आहेत.
सप्तश्रृंगी घाटात एस टी बस अपघात झाला आहे. त्याची माहिती घेतली असून संबंधीत यंत्रणेला सर्वतोपरी मदतीच्या सूचना दिल्या आहेत. बस अपघातातील जखमींना जवळच्या वणी येथील शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले आहे. जी माहिती आहे त्यानुसार खामगाव डेपोची बस असून त्यातील १८ प्रवासी जखमी आहेत. गणपती पॉइंट जवळ वणी गड उतरत असताना हा अपघात झाला आहे. अशी प्रार्थमीक माहिती आहे. अपघात ग्रस्तांची कुठलीही गैरसोय होणार नाही. यासंबंधी यंत्रणेला सूचना दिल्या असून मी स्वतः संपर्कात आहे. सर्व परिस्थितीवर लक्ष ठेवून आहे, असं दादा भुसे यांनी सांगितले.