वणीत एसटी बसेस रिकाम्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 20, 2020 10:54 PM2020-03-20T22:54:45+5:302020-03-21T00:34:37+5:30

कोरोना विषाणूच्या संक्रमणावर मात करण्यासाठी सज्ज झालेल्या प्रशासकीय यंत्रणेला साथ देत नागरिकांनी सहकार्य केल्याने गर्दीची ठिकाणे ओस पडली आहेत. येथून जात असलेल्या एसटी बसमधील प्रवाशांची संख्या खूपच घटली आहे. तसेच खासगी प्रवासी वाहनांची संख्याही रोडावली आहे.

The ST buses are empty | वणीत एसटी बसेस रिकाम्या

वणीत एसटी बसेस रिकाम्या

Next
ठळक मुद्देप्रवासी वाहतुकीमध्ये घट : मार्गावर शुकशुकाट

वणी : कोरोना विषाणूच्या संक्रमणावर मात करण्यासाठी सज्ज झालेल्या प्रशासकीय यंत्रणेला साथ देत नागरिकांनी सहकार्य केल्याने गर्दीची ठिकाणे ओस पडली आहेत. येथून जात असलेल्या एसटी बसमधील प्रवाशांची संख्या खूपच घटली आहे. तसेच खासगी प्रवासी वाहनांची संख्याही रोडावली आहे.
कोरोना या विनाशकारी विषाणूचा संसर्ग रोखण्यासाठी शासकीयआदेशाचे पालन करीत शुक्रवारी सलग दुसऱ्या दिवशीही वणीत बंद पाळण्यात आला. बाजारपेठा थंडावल्या तर आर्थिक उलाढाल ठप्प झाली. सर्व व्यवसायावर याचा परिणाम झाला आहे. मार्चएन्डची गणितेही कोरोनामुळे चुकली आहेत. किराणा, भाजीपाला व अत्यावश्यक सेवा वगळता प्रशासनाला विविध व्यावसायिकांनी सहकार्य केले.
दरम्यान कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मंगळवारचा आठवडे बाजार बंद ठेवण्यात आल्याची माहिती सरपंच सुनीता भरसट यांनी दिली. सुमारे १०० गावे व खेडीपाडी येथील विविध व्यावसायिक व खरेदीदार ग्रामस्थांची आर्थिकवाहिनी म्हणून वणीचा आठवडे बाजार ओळखला जातो. सर्वांना आगाऊ सूचना देण्यात आल्या असून, नागरिकांनी सहकार्य करण्याचे आवाहन उपसरपंच मनोज शर्मा, विलास कड, मधुकर भरसठ यांनी केले आहे.

Web Title: The ST buses are empty

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.