एसटीच्या वाहक-चालकाला दंड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 10, 2019 01:52 AM2019-01-10T01:52:42+5:302019-01-10T01:52:54+5:30

पिंपळगाव बसवंत : एसटी स्थानकात न नेता महामार्गावर मध्येच प्रवाशाला उतरून देणे बसचालक व वाहकाला महागात पडले असून, प्रवाशाच्या तक्रारीनंतर ग्राहक तक्रार निवारण न्याय मंचने संबंधित चालक व वाहकाला सात हजार रुपयांचा दंड ठोठावून ती नुकसानभरपाई संबंधित प्रवाशाला देण्याचे आदेशित केले आहे.

ST carrier driver penalties | एसटीच्या वाहक-चालकाला दंड

एसटीच्या वाहक-चालकाला दंड

googlenewsNext

पिंपळगाव बसवंत : एसटी स्थानकात न नेता महामार्गावर मध्येच प्रवाशाला उतरून देणे बसचालक व वाहकाला महागात पडले असून, प्रवाशाच्या तक्रारीनंतर ग्राहक तक्रार निवारण न्याय मंचने संबंधित चालक व वाहकाला सात हजार रुपयांचा दंड ठोठावून ती नुकसानभरपाई संबंधित प्रवाशाला देण्याचे आदेशित केले आहे.
जिल्हा ग्राहक तक्रार निवारण न्याय मंच नाशिक यांच्याकडे पिंपळगाव बसवंत येथील सुरेश हरिराम चव्हाण यांनी तक्रार दाखल केली होती. या तक्रारीनुसार मालेगाव बस आगाराची नाशिक-मालेगाव या बसने (क्र. एमएच १४ बीटी ३८०४) सुरेश चव्हाण दि. ६ डिसेंबर २०१७ रोजी नाशिक येथून पिंपळगाव बसवंतला जाण्यासाठी बसले. सदर बसला पिंपळगावी बसस्थानकात थांबा असूनही चालकाने बस स्थानकात न नेता मुंबई-आग्रा महामार्गावरच उतरून दिले. चव्हाण यांनी याबाबत त्याचा जाब विचारला असता, वाहक व चालकाने चव्हाण यांना अर्वाच्य भाषेचा वापर करत अपमानास्पद वागणूक दिली होती.

Web Title: ST carrier driver penalties

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.