एसटी प्रवर्गातील रुग्णांना मिळणार रेमडेसिविरचा खर्च
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 22, 2021 04:14 AM2021-04-22T04:14:53+5:302021-04-22T04:14:53+5:30
आदिवासी उपयोजना क्षेत्र व आदिवासी उपयोजना बाह्य क्षेत्रातील खाजगी रुग्णालयात कोराेना या आजारामुळे दाखल झालेल्या अनुसुचित जमातीच्या रुग्णास रेमडेसिविर ...
आदिवासी उपयोजना क्षेत्र व आदिवासी उपयोजना बाह्य क्षेत्रातील खाजगी रुग्णालयात कोराेना या आजारामुळे दाखल झालेल्या अनुसुचित जमातीच्या रुग्णास रेमडेसिविर इंजेक्शनसाठी येणारा खर्च भागविण्यासाठी प्रत्येक प्रकल्प स्तरावर, प्रकल्प अधिकारी, एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प यांना १० लक्ष रुपये पर्यंतचा खर्च करण्यास न्युक्लिअस बजेट योजनेंतर्गत मान्यता देण्यात आली आहे. यासाठी शासनाने काही अटी घातल्या आहेत. त्यात प्रामुख्याने, रुग्ण हा अनुसूचित जमातीचा असावा. त्याचे वार्षिक उत्पन्न ८ लक्ष रूपये पर्यंत असावे.
खाजगी रुग्णालय हे महात्मा ज्योतिबा फुले जनआरोग्य योजनेंतर्गत नोंदणीकृत नसावे. आदिम जमाती/ दारिद्रय रेषेखालील/ विधवा/ अपंग/ परितक्क्या निराधार महिला यांचा प्राधान्याने
विचार करण्यात यावा.
खर्च करतांना प्रकल्प अधिकारी, एकात्मिक आदिवासी विकास
यांनी रेमडिसीव्हीर इंजेक्शनसाठी सद्यस्थितीत असलेल्या विहित कार्यपध्दतीचा अवलंब करावा, असे नमूद करण्यात आले आहे.