एस.टी. शहरबसचा अध्याय संपला...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 5, 2021 04:10 AM2021-07-05T04:10:56+5:302021-07-05T04:10:56+5:30

नाशिक: शहराची प्रवासी वाहतूक करणाऱ्या राज्य परिवहन महामंडळाची लालपरी आता विस्मृतीत जाणार आहे. येत्या ८ जुलैपासून नाशिक महापालिकेची ...

S.T. City bus chapter over ... | एस.टी. शहरबसचा अध्याय संपला...

एस.टी. शहरबसचा अध्याय संपला...

googlenewsNext

नाशिक: शहराची प्रवासी वाहतूक करणाऱ्या राज्य परिवहन महामंडळाची लालपरी आता विस्मृतीत जाणार आहे. येत्या ८ जुलैपासून नाशिक महापालिकेची बससेवा सुरू होणार असल्याने राज्य परिवहन महामंडळाच्या शहर बसचा अध्याय संपुष्टात येईल. गेल्या चार वर्षांपासून टप्प्याटप्प्याने शहर बसेस बंद करण्यात आलेल्या आहेतच आता तर संपूर्ण शहर बसच इतिहासजमा होणार असल्याने लालपरीच्या केवळ आठवणी उरणार आहे.

महापालिकेची बससेवा सुरू होण्यापूर्वी महामंडळाच्या सुमारे १५० बसेसच्या माध्यमातून शहराच्या प्रवासी वाहतुकीचा भार वाहिला जात होता. महापालिका हद्दीत प्रवासी वाहतूक करणे महामंडळाची नव्हे तर महापालिकेची जबाबदारी असल्याची चर्चा सुरू झाली आणि गेल्या दहा वर्षांपासून एस.टी. महामंडळाने महापालिकेकडे यासाठीचा पत्रव्यवहार सुरू केला होता. अनेकदा तर शहरातील संपूर्ण प्रवासी वाहतूक बंद करण्याचा अल्टिमेटम देखील महापालिकेला दिला गेला. शहर प्रवासी वाहतुकीची जबाबदारी कुणाची याबाबत अनेक दावे-प्रतिदावे करण्यात आल्यामुळे यात दोन-तीन वर्ष निघून गेली.

महापालिकेची कभी हा, कभी ना अशी भूमिका राहिल्याने राज्य परिवहन महामंडळाने शहरातील अनेक मार्गावरील बसेस हळूहळू काढून घेण्यास सुरूवात केली. सुरुवातीला शहरालगतच्या गावांमधील बसेस कमी करण्यात आल्या. त्यानंतर जेथे बसेस सुरू आहेत तेथील फेऱ्या कमी करण्यात आल्या. मागील दोन वर्षांपासून तर मुख्य मार्गांवरील बसेस देखील बंद करण्यात आल्या आणि संपूर्ण शहरातूनच महामंडळाच्या बसेस बंद करण्यात आल्या आहेत.

---इन्फो--

१९४८ साली राज्यात परिवहन महामंडळाची सेवा सुरू झाली. नाशिकमध्ये १९५५ च्या दरम्यान प्रवासी वाहतुकीला सुरूवात करण्यात आल्याचे सांगितले जाते. त्याकाळी शहर आणि ग्रामीण असे स्वतंत्र विभाग नव्हते. भद्रकाली येथूनच पूर्वी बसेस सोडल्या जात होत्या. शहराचा विस्तार होत गेला तशी महामंडळाने बसेसची संख्या वाढवत नियोजन करण्यास सुरूवात केली. ३० नोव्हेंबर १९७९ मध्ये पंचवटी डेपोचे उद्‌घाटन करण्यात आले आणि संपूर्ण शहरात महामंडळाच्या बसेसच्या माध्यमातून प्रवासी वाहतूक सुरू झाली. नाशिकच्या जडणघडणीत बसेसचे मेाठे योगदान राहिले.

--इन्फो--

पंचवटी निमाणी डेपो येथून संपूर्ण शहराची प्रवासी वाहतूक केली जात होती. नाशिकरोड येथूनही काही बसेस सुरू होत्या. विद्यार्थ्यांसाठी देखील महामंडळाची बससेवा सुरक्षित मानली जात होती. त्यामुळे बसमधून प्रवास करणाऱ्या मुलींची संख्या देखील मोठी होती.

--इन्फो--

शहराच्या ९८ बसेस धावणार ग्रामीण मार्गावर

महामंडळाने संपूर्ण शहर वाहतूक बंद करण्यापूर्वी ९८ बसेस शहरासाठी धावत होत्या. महापालिकेच्या बससेवेमुळे या बसेस आता ग्रामीण भागासाठी वापरण्यात येणार आहेत. त्याचप्रमाणे निमाणी आणि नाशिकरोड येथील बसस्थानकातून ग्रामीण भागातील प्रवासी वाहतूक सुरू होणार आहे.

Web Title: S.T. City bus chapter over ...

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.