एसटी महामंडळ आर्थिक संकटात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 9, 2019 12:35 AM2019-12-09T00:35:12+5:302019-12-09T00:36:28+5:30
आर्थिक तोट्यातून जाणाऱ्या राज्य परिवहन महामंडळाचा फटका आता नाशिक विभागालादेखील बसला असून, येथील कर्मचाऱ्यांचे वेतन करण्यासाठी एस.टी.कडे पुरेसे पैसे नसल्याची बाब समोर आली आहे. कर्मचाºयांना टप्प्याटप्प्याने वेतन अदा केले जात असून, ज्यांची वैद्यकीय बिले थकीत आहेत अशी बिले अदा न करण्याचे धोरण महामंडळाने घेतले असल्याची चर्चा आहे.
नाशिक : आर्थिक तोट्यातून जाणाऱ्या राज्य परिवहन महामंडळाचा फटका आता नाशिक विभागालादेखील बसला असून, येथील कर्मचाऱ्यांचे वेतन करण्यासाठी एस.टी.कडे पुरेसे पैसे नसल्याची बाब समोर आली आहे. कर्मचाºयांना टप्प्याटप्प्याने वेतन अदा केले जात असून, ज्यांची वैद्यकीय बिले थकीत आहेत अशी बिले अदा न करण्याचे धोरण महामंडळाने घेतले असल्याची चर्चा आहे. मागील महिन्यांपासून राज्य परिवहन महामंडळ आर्थिक तोट्यातून जात असल्यामुळे अशी परिस्थिती उद्भवल्याचे बोलले जात आहे.
राज्य परिवहन महामंडळाच्या कर्मचाºयांना दि. १ ते ३ तारखेला वेतन अदा केले जाते. तत्पूर्वी कर्मचाºयांना पगारपत्रक दिले जाते. पगारपत्रकावर वेतनाची संपूर्ण रक्कम दाखविण्यात आली असली तर कर्मचाºयांच्या हाती मात्र पूर्ण पगार अद्यापही पडलेला नाही. एसटीतील ज्या युनिटला दहा ते बारा कामगार आहेत अशा युनिटच्या कर्मचाºयांना वेतन अदा करण्यात आले आहे, मात्र जेथे कर्मचारी संख्या मोठी आहे तेथे मात्र टप्प्याटप्प्याने वेतन देण्याचे धोरण महामंडळाने घेतल्याचे दिसते. कर्मचाºयांना विलंबाने वेतन देण्यात आले असून, पगाराच्या केवळ ८१ टक्के वेतन देण्यात आले आहे उर्वरित १९ टक्के वेतन कधी देणार याबाबतची मात्र अनिश्चितता आहे.
कर्मचाºयांची वैद्यकीय बिले गेल्या तीन ते पाच वर्षांपासून महामंडळाच्या मुख्यालयात पडून आहेत. विशेषत: मोठ्या रकमेची बिले अद्यापही मंजूर करण्यात आलेली नाहती. जी बिले मंजूर आहेत ते केवळ महामंडळाकडे पुरेसा निधी नसल्याने रोखून धरण्यात आले असल्याचे एका कामगार पदाधिकाºयाने सांगितले.