दिवाळीसाठी एसटी महामंडळ सज्ज
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 12, 2020 01:05 AM2020-11-12T01:05:28+5:302020-11-12T01:06:18+5:30
दिवाळी सणाच्या पार्श्वभूमीवर राज्य परिवहन महामंडळाने जिल्हा तसेच जिल्ह्याबाहेर जाण्यासाठी ६३ जादा बसेसचे नियोजन केले आहे. जिल्ह्यातील सर्व आगारांमधून प्रवासीसंख्येनुसार बसेस सेाडण्यात येणार आहेत. पुणे आणि मुंबईसाठीदेखील दर अर्ध्यातासाने बसेस सोडण्याचे नियोजन करण्यात आले आहे.
नाशिक : दिवाळी सणाच्या पार्श्वभूमीवर राज्य परिवहन महामंडळाने जिल्हा तसेच जिल्ह्याबाहेर जाण्यासाठी ६३ जादा बसेसचे नियोजन केले आहे. जिल्ह्यातील सर्व आगारांमधून प्रवासीसंख्येनुसार बसेस सेाडण्यात येणार आहेत. पुणे आणि मुंबईसाठीदेखील दर अर्ध्यातासाने बसेस सोडण्याचे नियोजन करण्यात आले आहे.
शहर, जिल्ह्यात सध्या बसेस सुरू असल्या तरी अजूनही अपेक्षित प्रवासी मिळत नसल्याने महामंडळाला फारसे उत्पन्न मिळत नाही. अशा पार्श्वभूमीवर दिवाळीसाठी जादा बसेसचे नियोजन राज्य परिवहन महामंडळाने केले आहे. जिल्ह्यांतर्गत प्रवासी वाहतूकही जादा बसेसच्या माध्यमातून करण्यात येणार असून, त्यासाठी बसेस सोडण्यात आलेल्या आहेत. त्याप्रमाणे मुंबई, बोरीवली, पुणे येथे जाण्यासाठी दर अर्ध्या तासाने बसेस सोडण्यात येणार आहेत. धुळे, जळगाव, औरंगाबाद, नंदुरबार आदी ठिकाणी प्रवासीसंख्या जादा असण्याची शक्यता गृहीत धरून बसेसचे नियोजन करण्यात आले आहे.