एस.टी. चालक वाहकांनाही कोरेाना लसीची प्रतीक्षा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 17, 2021 04:15 AM2021-03-17T04:15:54+5:302021-03-17T04:15:54+5:30

कोरेानाच्या संकट काळात एस.टी. महामंडळाला सर्वाधिक फटका बसला. त्यांचे दैनंदिन उत्पन्न घटले तर दर महिन्याला होणाऱ्या पगाराबाबतची अनिश्िचतता देखील ...

S.T. Drivers also wait for Korena vaccine | एस.टी. चालक वाहकांनाही कोरेाना लसीची प्रतीक्षा

एस.टी. चालक वाहकांनाही कोरेाना लसीची प्रतीक्षा

Next

कोरेानाच्या संकट काळात एस.टी. महामंडळाला सर्वाधिक फटका बसला. त्यांचे दैनंदिन उत्पन्न घटले तर दर महिन्याला होणाऱ्या पगाराबाबतची अनिश्िचतता देखील निर्माण झाली. महामंडळाच्या अस्तित्वाचा प्रश्न गांभिर्याने समोर आला. मात्र काेरोना काहीप्रमाणात नियंत्रणात आल्यानंतर शासनाच्या आदेशानुसार टप्प्याटप्पयाने बसेस सुरू झाल्या आहेत. नाशिक जिल्ह्यात जवळपास ७० टक्के क्षमतेने बसेस धावत आहेत. शहर आणि ग्रामीण भागात प्रवासी सेवा दिली जात आहे. प्रवाशांकडून देखील प्रतिसाद मिळत असतांना कोरेानाने पुन्हा डोके वर काढले आहे.

जिल्ह्यातील १३ डेमोंमधून जवळपास ६०० पेक्षा अधिक बसेस सुरू असून सुमारे दोन हजार चालक-वाहक सेवा देत आहेत. याा कर्मचाऱ्यांचा रोजच प्रवाशांशी संपर्क येतो. अनेक गावांतील लोकांचा प्रवासाच्या निमित्ताने चालक-वाहकांशी संपर्क येतो. बसस्थानकापासून ते गावखेड्यातील बस थांब्यापर्यंत कोरेानाचा धोका चालक वाहकांच्या सतत मागावर असतो. प्रवाशांच्या गर्दीत कोण बाधित आहे हे कळण्याची कोणतीही व्यवस्था नाही. बसमधून प्रवास करणाऱ्यांकडे कोणतेही सर्टिफिकेट नसल्याने अनिश्चिततेच्या सावटाखाली या कर्मचाऱ्यांना सेवा बजवावी लागते.

गेल्या वर्षी कोरोना काळात परराज्यात चालकांनी सेवा दिली. मुंबईतील बेस्टच्या मदतीला हजार बसेस आणि त्याच्या दुप्पट कर्मचारी मुंबईत सेवा देत आहेत. सातत्याने माणसांच्या गराड्यात राहाणारा चालक वाहक हा नेहमीच असुरक्षित ठरतो. त्यामुळे या दोघांना प्रथम प्राधान्यावर शासनाने लस पुरवावी अशी मागणी कर्मचाऱ्यांकडून केली जात आ हे.

--इन्फो--

सुपरस्प्रेडरच्या गराड्यात

चालक-वाहक हे सातत्याने सुपरस्प्रेडर्सच्या गराड्यात राहातात. महामंडळाकडून त्यांना सुरक्षिततेची काळजी घेण्यास सांगितले जाते.परंतु प्रवाशांच्या गर्दीतच त्यांना सेवा दयावी लागते. गर्दीने भरलेल्या बसमध्येच चालक वाहकांना थांबावे लागते. मागीलवर्षी एस.टीतील बाधितांची संख्या पाहाता आता या कर्मचाऱ्ायंना प्राधान्याने कोरोना लस देण्याची मागणीहोत आहे.

--कोट--

प्रवाशांच्या गर्दीत चालक-वाहकांना काम करावे लागते. रोजच त्यांचा गर्दीशी संपर्क येत असल्याने त्यांना प्राधान्याने लस दिली पाहिजे. शासनाने सुपर स्प्रेडर्सवर लक्ष केंद्रित केले आहेत. गर्दीत असे अनेक सुपरस्प्रेडर्स असू शकतात. ही शक्यता लक्षात घेऊन एस.टी. महामंडळातील चालक-वाहक तसेच स्थानकांवरील कर्मचाऱ्यांना केारोना प्रतिबंधात्मक लस दिली पाहिजे.

- स्वप्नील गडकरी, विभागीय सचिव एस.टी. कामगार संघटना

Web Title: S.T. Drivers also wait for Korena vaccine

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.