अवघे 223 वेतन झाल्याने एसटी कर्मचार्याची आत्महत्या?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 10, 2020 09:12 PM2020-10-10T21:12:32+5:302020-10-11T00:49:46+5:30
नाशिक : एसटी महामंडळाच्या नाशिक1 आगारात हेल्पर म्हणून काम करणाया अशोक ताडकुळे (30) याने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना शनिवारी सकाळी उघडकीस आली. केवळ 223 रु पये इतका पगार हाती आल्याने नैराश्यातून त्याने आत्महत्या केली असावी अशी चर्चा कामगार वर्गात सुरू आहे.

ताडकुळे हा मुळचा नांदेड येथील रहिवासी आहे. पंचवटीतील कोणार्कनगर येथे ही घटना घडली. ताडकुळे हा एसटीतील आपल्या एका मित्रासमवेत येथे भाडेतत्वावर राहत होता. त्याचा मित्र रात्रपाळीहून घरी परतला तेव्हा अशोक गळफास लावलेल्या अवस्थेत आढळून आला. ही घटना कामगारांना कळल्यानंतर त्यांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेतली. अचानक घडलेल्या या घटनेमुळे अनेक तर्कवितर्क लढविले जात आहेत. दरम्यान, तीन महिन्यांच्या प्रतीक्षेनंतर गेल्या 7 तारखेला जुलै महिन्याचे वेतन त्याच्या हाती आले. जुलै महिन्यातील सुट्या शिल्लक नसल्यामुळे अवघे 223 रु पये इतके वेतन त्याला मिळाले. कुटूंबाची संपुर्ण जबाबादारी त्याच्यावर असल्याने कमी वेतनामुळे तो काहीसा तणावात होता त्यामुळे नैराश्यातून त्याने आत्महत्या केली असावी अशी चर्चा कामगार वर्गात सुरू आहे. ताडकुळे हा मुळ नांदेड येथील किनवट येथील रहिवासी असून 2015 मध्ये तो महामंडळात रूजू झाला होता. नोकरीसाठी तो कुटूंबाला सोडून नाशिकमध्ये राहत होता. कुटूंबात तो एकमेव कमावता असल्याने त्याच्यावरच सर्व जबाबदारी होती.