एसटी कामगार सेनेचे मुंडण आंदोलन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 4, 2017 12:15 AM2017-10-04T00:15:30+5:302017-10-04T00:15:34+5:30
नाशिक : वेतन कराराची मुदत संपूनदेखील वेतन करार नियमानुसार अद्याप अस्तित्वात येण्यासाठी कामगार संघटनेने प्रयत्न करणे आवश्यक असताना १८ महिने उलटूनही संघटना व महामंडळ प्रशासन पुढाकार घेत नसल्याचा आरोप महाराष्टÑ एसटी कामगार सेनेच्या वतीने करण्यात आला. यावेळी कामगारांनी विभागीय कार्यालयाच्या प्रवेशद्वारावर मंगळवारी (दि.३) मुंडण आंदोलन करत निषेध नोंदविला.

मागील वर्षी मार्च महिन्यात वेतन कराराची मुदत संपूनदेखील कामगार कायद्यानुसार वेतन करार नियमानुसार अस्तित्वात अद्याप आलेला नाही. यासाठी एस.टी. कामगार संघटनेने प्रयत्न करणे गरजेचे होते.
तसेच राज्य शासन व एसटी महामंडळ प्रशासनानेही २०१६ ते २०२० पर्यंत कर्मचाºयांचा एकत्रित वेतन करार करण्यास अनुकूलता दाखविली; मात्र प्रलंबित कामगार करार संघटनेने हटवादी व कामगारद्रोही कृत्य केल्याच्या निषेधार्थ कामगार सेनेचे विभागातील पदाधिकारी व सभासदांनी मुंडण करून निषेध नोंदविला. यावेळी सचिव सुभाष जाधव, श्याम इंगळे, देवीदास सांगळे, नितीन जगताप आदी सभासद उपस्थित होते. एकत्रित वेतन करार नव्याने लवकरात लवकर अस्तित्वात आणावा, अशी मागणी यावेळी आंदोलकांनी करत मागणीचे निवेदन विभाग नियंत्रक यामिनी जोशी यांना दिले.