एसटी कामगार सेनेची पूरग्रस्तांसाठी मदत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 29, 2021 04:14 AM2021-07-29T04:14:51+5:302021-07-29T04:14:51+5:30
शिवसेना पक्षप्रमुख व महाराष्ट्राचे संवेदनशील मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त कोणताही समारंभ न करता कोकण व पश्चिम महाराष्ट्रातील पूरग्रस्त ...
शिवसेना पक्षप्रमुख व महाराष्ट्राचे संवेदनशील मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त कोणताही समारंभ न करता कोकण व पश्चिम महाराष्ट्रातील पूरग्रस्त नागरिकांना अन्नधान्य व नित्याच्या जीवनावश्यक वस्तूंची मदत करावी, असे आवाहन सिन्नर तालुका शिवसेनेच्या वतीने करण्यात आले होते. त्यास एस. टी. कामगार सेनेने प्रतिसाद दर्शवला. एसटी कामगार सेनेचे विभागीय सचिव देवा सांगळे यांनी पुढाकार घेत आगारात ‘एक हात मदतीचा’ उपक्रम राबविला. कर्मचाऱ्यांनी त्यास सकारात्मक प्रतिसाद दिला. ही मदत माजी आमदार वाजे यांच्याकडे सुपूर्द करण्यात आली. यावेळी शिवसेना शहरप्रमुख गौरव घरटे, कार्यालयीन प्रतिनिधी पिराजी पवार, एसटी कामगार सेनेचे विभागीय सचिव देवा सांगळे, नीलेश कर्पे, दया बैरागी, राहुल भावसार, अरुण झगडे, भरत मुठे, सोमनाथ पगार, श्याम पोरजे, रूपेश टोपे, अशोक घुमरे, परेश वाघ, दीपक डोंगरे आदी उपस्थित होते.
फोटो - २८ सिन्नर एसटी
सिन्नर आगारातील एस. टी. कामगार सेनेच्या वतीने कोकण व पश्चिम महाराष्ट्रातील पूरग्रस्तांना जीवनावश्यक वस्तूंची मदत माजी आमदार राजाभाऊ वाजे यांच्याकडे सुपूर्द करताना एस. टी. कामगार सेनेचे विभाग सचिव देवा सांगळे, सोमा पगार, श्याम पोरजे, दया बैरागी, अशोक घुमरे, अरु ण झगडे, गौरव घरटे, पिराजी पवार आदी.
280721\28nsk_17_28072021_13.jpg
फोटो - २८ सिन्नर एसटी सिन्नर आगारातील एस. टी. कामगार सेनेच्या वतीने कोकण व पश्चिम महाराष्ट्रातील पूरग्रस्तांना जीवनावश्यक वस्तूंची मदत माजी आमदार राजाभाऊ वाजे यांच्याकडे सुपुर्द एस. टी. कामगार सेनेचे विभाग सचिव देवा सांगळे, सोमा पगार, श्याम पोरजे, दया बैरागी, अशोक घुमरे, अरु ण झगडे, गौरव घरटे, पिराजी पवार आदी.