रखडलेली कपाटकोंडी फुटण्याची चिन्हे!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 28, 2019 12:44 AM2019-03-28T00:44:42+5:302019-03-28T00:45:03+5:30

गेल्या तीन ते चार वर्षांपासून रखडलेली कपाटकोंडी फुटण्याची चिन्हे आहेत. रूंद रस्त्यासाठी जागा देण्यास सुमारे २८०० प्रस्ताव नगररचना विभागात सादर झाले

 Stacked cupboards sprout symbols! | रखडलेली कपाटकोंडी फुटण्याची चिन्हे!

रखडलेली कपाटकोंडी फुटण्याची चिन्हे!

Next

नाशिक : गेल्या तीन ते चार वर्षांपासून रखडलेली कपाटकोंडी फुटण्याची चिन्हे आहेत. रूंद रस्त्यासाठी जागा देण्यास सुमारे २८०० प्रस्ताव नगररचना विभागात सादर झाले असून, त्यामुळेच आता पडताळणी करून पुढील कार्यवाही करण्यात येणार आहे.
सदनिका बांधताना त्यातील कपाटासाठी असलेली जागा मूळ सदनिकेत समाविष्ट करून मुक्त चटई क्षेत्राचा पूर्णत: वापर करण्याचे प्रकार नाशिक शहरात घडले असून, हजारो प्रकरणे पूर्णत्वाच्या दाखल्याविना अडकली आहेत. वाढीव चटई क्षेत्राशिवाय कपाट प्रकरणे नियमित होत नसल्याने त्याबाबत बांधकाम व्यावसायिकांनी राज्य शासनाकडे अनेकदा चकरा घातल्या; परंतु उपयोग झाला नव्हता; मात्र त्यानंतर आयुक्तांनी आपल्या विशेषाधिकाराचा वापर करून कलम २१० अन्वये शहरातील सर्व सहा व साडेसात मीटर रूंदीचे रस्ते किमान नऊ मीटर करण्याची योजना आखली. अशा रस्त्यांसाठी दोन्ही बाजूच्या मिळकतदारांकडून समसमान जागा घेऊन त्या बदल्यात त्यांना वाढीव चटई क्षेत्र देण्याची योजना आहे, त्यामुळे कपाट प्रकरणे नियमित होऊ शकतात असे सांगितले जाते.
गेल्यावर्षी आयुक्तांनी यासंदर्भात निर्णय घेतल्यानंतर त्यासाठी २८०० नागरिकांनी प्रस्ताव दिले असून, आपल्या मिळकती घेऊन नऊ मीटर रूंदीचा रस्ता करण्यास संमती दिली आहे. तलाठ्याकडे जाऊन आणि रस्त्याच्या क्षेत्रावर महापालिकेचे नाव लावून त्याची कागदपत्रे महापािलकेत जमा करण्यात आली आहेत, त्या आधारे आता नगररचना विभाग छाननी करणार असून, नियमात बसणाऱ्या मिळकतधारकांना वाढीव चटई क्षेत्र देण्यात येणार असल्याने कपाटकोंडी फुटू शकेल.
संबंध नसणाऱ्यांना फटका
कपाटकोंडी फोडण्यासाठी आयुक्त तुकाराम मुंढे यांनी विशेषाधिकाराचा वापर केल्याने आता सर्वच रस्ते किमान नऊ मीटर रूंद होणार आहेत. तथापि, कपाटकोंडीचा संबंध नसलेल्या प्लॉट धारकांना गरज नसताना नऊ मीटर रस्ता रूंद करण्यासाठी सतीने जागा घेण्यात आली. ज्यांच्या इमारती बांधून केवळ पूर्णत्वाचा दाखला घेणे बाकी होते त्यांनाही नियमाचा फटका बसला आहे.

Web Title:  Stacked cupboards sprout symbols!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.