गटबाजीने केला घात, उद्योग विकासला साथ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 1, 2018 12:49 AM2018-08-01T00:49:35+5:302018-08-01T00:49:49+5:30
नाशिक इंडस्ट्रीज अॅन्ड मन्युफॅक्चरर्स असोसिएशन (निमा) मध्ये गेल्या अनेक वर्षांपासून सत्तेत असणाऱ्या सत्ताधारी एकता पॅनलच्या गटबाजीला कंटाळलेल्या सभासदांना पर्याय मिळाल्यानेच उद्योग विकास पॅनलने सत्ता काबीज केली आहे. तर उद्योग विकास पॅनलने सत्ताधाºयांना धूळ चारली आणि आयमा निवडणुकीतील वचपा काढून एका दगडात दोन पक्षी मारले आहेत.
सातपूर : नाशिक इंडस्ट्रीज अॅन्ड मन्युफॅक्चरर्स असोसिएशन (निमा) मध्ये गेल्या अनेक वर्षांपासून सत्तेत असणाऱ्या सत्ताधारी एकता पॅनलच्या गटबाजीला कंटाळलेल्या सभासदांना पर्याय मिळाल्यानेच उद्योग विकास पॅनलने सत्ता काबीज केली आहे. तर उद्योग विकास पॅनलने सत्ताधाºयांना धूळ चारली आणि आयमा निवडणुकीतील वचपा काढून एका दगडात दोन पक्षी मारले आहेत. सत्तेत आलेल्या उद्योग विकास पॅनलमध्ये वेगवेगळ्या विचारांचे लोक एकत्र आलेले आहेत. आता एका विचाराने त्यांना काम करून सभासदांनी टाकलेला विश्वास सार्थ करावा लागणार आहे. या निवडणुकीत भाजपाच्या उद्योग आघाडीच्या प्रदेशाध्यक्षांसह तीन जण निवडून आल्याने आता राज्यातील त्यांच्याच पक्षाच्या सत्तेतून नाशिककरांच्या हाती काय लागते हा महत्त्वाचा प्रश्न आहे. निमाच्या निवडणुकीपूर्वी आयमाची निवडणूक झाली. त्या निवडणुकीत एकता विरु द्ध (केवळ तुषार चव्हाण यांच्या अध्यक्षपदासाठी) एकता अशी लढत झाली होती. त्यावेळी एकता जिंकली आणि एकट्या तुषार चव्हाण यांना अल्पमतांनी पराभव पत्करावा लागला होता. तेव्हापासून चव्हाण गट सक्रि य झाला होता. त्यानंतर निमाची निवडणूक जाहीर झाली आणि एकता पॅनलने ज्येष्ठांची सुकाणू समिती स्थापन करण्यात आली. या समितीने पॅनलच्या इच्छुक उमेदवारांच्या मुलाखतीचा खेळ आठ दिवस खेळला. त्याचवेळी आपल्याला विश्वासात घेतले नाही म्हणून तुषार चव्हाण गटाने उमेदवार जुळवून उद्योग विकास पॅनल तयार करून एकताला पर्याय देऊन टाकला होता. तरीही एकता पॅनलचे श्रेष्ठी हवेतच राहिलेत. उमेदवारी अर्ज माघारीपर्यंत एकता पॅनलचे पूर्ण उमेदवार निश्चित होऊ शकले नाहीत. अध्यक्ष आणि लघु उद्योग गटासाठीचे उपाध्यक्ष पदासाठीच्या उमेदवाराचा घोळ संपला नाही आणि एकता पॅनलमध्ये सरळसरळ फूट पडून एका एकताचे दोन ऐकतात रूपांतर झाले. यात किशोर राठी-आशिष नहार यांचे एकता पॅनल आणि त्यांच्या विरोधात हरिशंकर बॅनर्जी-उदय खरोटे यांचेही एकता पॅनल म्हणजेच तीन पॅनल एकमेकांसमोर उभे राहिले. दोन्ही एकता पॅनलमध्ये कामाचा श्रेयवाद रंगला होता. या दोघांच्या भांडणात उद्योग विकास पॅनलने बाजी मारली. पाटणकर यांच्या पॅनलचे हरिशंकर बॅनर्जी विजयी झाले मात्र पदाधिकाºयांच्या सर्व जागा गमवाव्या लागल्या आहेत. त्या सर्व जागा उद्योग विकास पॅनलने आपल्या ताब्यात घेतल्या आणि सिन्नरच्या जागाही काबीज करून सत्ता खेचून आणली आहे. तर बेळे गटाला ३२ पैकी केवळ तीन जागा मिळवून नाचक्की ओढवून घ्यावी लागली आहे.
निमाचे प्रश्न सोडविण्याचे आव्हान
सत्तेत आलेल्या उद्योग विकास पॅनलमध्ये उद्योग आघाडीचे प्रदेश अध्यक्ष प्रदीप पेशकार, भाजपा प्रणित एक लघुउद्योग भारतीचे नाशिक शाखेचे अध्यक्ष संजय महाजन तसेच भाजपाचे नगरसेवक शशिकांत जाधव हे निवडून आले आहेत. तर पक्षाच्या नगरसेविका अलका अहिरे यांचे पती कैलास अहिरे असे पदाधिकारी निवडून आले आहेत. केंद्रात व राज्यात भाजपाची सत्ता असल्याने शासन दरबारी निमाचे प्रश्न सुटण्यास अडचण कशी मदत होते हे बघणे महत्त्वाचे आहे.