मतदान केंद्रांवर कर्मचारी साहित्य घेऊन रवाना; बूथवर मंडप उभारणी, पिण्याच्या पाण्याची सोय
By Suyog.joshi | Published: May 19, 2024 02:10 PM2024-05-19T14:10:37+5:302024-05-19T14:12:07+5:30
सोमवार (दि.20) सकाळी 7 ते सायंकाळी सहा वाजेपर्यंत पंचवटी विभागातील म्हसरूळ, मेरी, मखमलाबाद, आडगाव, नांदूर, हिरावाडी, पंचवटी गावठाण, फुलेनगर आदिंसह 22 मतदान केंद्रावर मतदान होणार आहे.
पंचवटी, नाशिक (संदीप झिरवाळ): उद्या सोमवारी (दि 20) लोकसभा निवडणुकीसाठी मतदान होणाऱ्या परिसरातील मतदान केंद्रावर सकाळ पासून मंडप उभारणी, खुर्च्या व टेबल सह साहित्य टाकण्याचे काम सुरू करण्यात आले होते.
सोमवार (दि.20) सकाळी 7 ते सायंकाळी सहा वाजेपर्यंत पंचवटी विभागातील म्हसरूळ, मेरी, मखमलाबाद, आडगाव, नांदूर, हिरावाडी, पंचवटी गावठाण, फुलेनगर आदिंसह 22 मतदान केंद्रावर मतदान होणार आहे.
रविवारी सकाळपासूनच हिरावाडीतील मीनाताई ठाकरे विभागीय क्रीडा संकुलात मतदान केंद्रावर नेमणूक करण्यात आलेल्या कर्मचाऱ्यांना मतदान साहित्य वाटपाची प्रक्रिया सुरू करण्यात आली होती मतदान साहित्य वाटप केल्यानंतर कर्मचाऱ्यांना मतदान केंद्रावर पोहोचविण्यासाठी बस जीप गाड्या व्यवस्था करण्यात आलेली होती.
त्यासाठी परिसरातील मतदान केंद्र
मतदान केंद्र असलेल्या बूथ वर मंडप उभारणी तसेच येणाऱ्या नागरिकांना व कर्मचाऱ्यांना पिण्याच्या पाण्याची सोय साफसफाई विद्युत व्यवस्था चालू करणे दिव्यांग बांधवांसाठी व्हील चेअर व्यवस्था करण्यात आली आहे.