डॉक्टरांसह कर्मचाऱ्यांचे रिपोर्ट निगेटिव्ह
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 5, 2020 06:40 PM2020-08-05T18:40:18+5:302020-08-05T18:40:33+5:30
नगरसुल : ग्रामीण रु ग्णालय नगरसुल येथील डॉक्टर्स व इतर सर्व कर्मचारी अश्या २० जणांची तपासणी करून स्वॉब नमुने घेतले असता सदरील अधिकारी, डॉक्टर्स, कर्मचारी यांचे नमुने निगेटिव आढळून आले. ह्यामुळे सर्वांना लागलेली धाकधूक कमी झाली.
नगरसुल : ग्रामीण रु ग्णालय नगरसुल येथील डॉक्टर्स व इतर सर्व कर्मचारी अश्या २० जणांची तपासणी करून स्वॉब नमुने घेतले असता सदरील अधिकारी, डॉक्टर्स, कर्मचारी यांचे नमुने निगेटिव आढळून आले. ह्यामुळे सर्वांना लागलेली धाकधूक कमी झाली.
येवला तालुक्यातील नगरसुल ग्रामीण रु ग्णालय येथील सामवावरी (दि.३) एका परिचारिकेचा सॉब नमुना रिपोर्ट पॉझिटिव आल्याने त्यांना नाशिक येथे उपचारासाठी दाखल केले. सदरील अधिपरिचारिकाच्या संपर्कातील हाय रिस्क कॉन्टॅक्ट असलेले ग्रामीण रु ग्णालय नगरसुल येथील डॉक्टर्स व इतर सर्व कर्मचारी अश्या २० जणांची तपासणी करून स्वॉब नमुने घेतले असता सदरील अधिकारी, डॉक्टर्स, कर्मचारी यांचे नमुने निगेटिव आढळून आले. ह्यामुळे सर्वांना लागलेली धाकधूक कमी झाली असुन नगरसुल ग्रामिण रु ग्णालय कर्मचारी डॉक्टर, नर्स यांना व कॉरंटाइन होण्यापासून दिलासा मिळाला आहे.
नगरसुल ग्रामिण रु ग्णालयातील परिचारीका पॉझीटीव्ह आढळल्याने नगरसुलकरांमध्ये भिती वाढली होती. कारण लॉकडाउननंतर गावातील सर्व लोक गर्दीवर नियंत्रण ठेवण्यासाठी जनता सहकार्य करीत होती. पण दोन दिवसापुर्वी परिचारीकाचा पॉझीटीव्ह रिपोर्ट आल्यानंतर ग्रामस्थ धास्तावले, पण ह्या परिचारीकेच्या संपर्कात आलेल्या २० कर्मचाऱ्यांचे तातडीने स्वाब नमुने घेउन तपासणी केली असता ते सर्व रिपोर्ट निगेटिव्ह आले. त्यामुळे नगरसुलकरांनी समाधान व्यक्त केले आहे.