सलग दुरऱ्या वर्षी रखडल्या कर्मचाऱ्यांच्या बदल्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 14, 2021 04:15 AM2021-05-14T04:15:22+5:302021-05-14T04:15:22+5:30

नाशिक : दरवर्षी एप्रिल - मे महिन्यात होणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या प्रशासकीय बदल्यांना सलग दुसऱ्या वर्षी कोरोनाचा फटका बसला आहे. बदलीच्या ...

Staff transfers stalled for consecutive years | सलग दुरऱ्या वर्षी रखडल्या कर्मचाऱ्यांच्या बदल्या

सलग दुरऱ्या वर्षी रखडल्या कर्मचाऱ्यांच्या बदल्या

Next

नाशिक : दरवर्षी एप्रिल - मे महिन्यात होणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या प्रशासकीय बदल्यांना सलग दुसऱ्या वर्षी कोरोनाचा फटका बसला आहे. बदलीच्या प्रतीक्षेत असलेल्या कर्मचाऱ्यांच्या बदल्या मागीलवर्षीप्रमाणेच यंदाही लांबल्या आहेत.

राज्य शासकीय अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या सर्वसाधारण बसल्या दरवर्षी एप्रिल ते मे महिन्याच्या अखेरीस केल्या जातात. त्यामध्ये जिल्हा परिषद आणि महसूल विभागातील कर्मचऱ्यांची संख्या मोठी असते. मागीलवर्षी कोरोनाच्या संसर्गामुळे बदल्यांचा कालावधी वाढविण्यात आला होता. सदर बदल्या मेऐवजी १० ऑगस्ट २०२० पर्यंत करण्याचे आदेश शासनाने दिले होते. दरम्यानच्या कालावधीत २०२०-२१ हे आर्थिक वर्ष संपून सन २०२१-२०२२ आर्थिक वर्ष सुरू झाल्यामुळे मागील वर्षीच्या बदल्या होऊ शकल्या नव्हत्या. तीच परिस्थिती यंदा देखील निर्माण झाली आहे. यावर्षी ३० जूनपर्यंत कोणत्याही बदल्या करण्यात येऊ नयेत, असे आदेश शासनाने काढले आहेत. त्यामुळे महसूल विभागातील १५० पेक्षा अधिक कर्मचाऱ्यांच्या बदल्या रखडल्या आहेत.

मागीलवर्षी महसूल विभागातील पदोन्नतीने बदली झालेल्या कर्मचाऱ्यांना नियुक्ती देण्यात आली होती. तसेच नव्यानेच तलाठी परीक्षा उत्तीर्ण झालेल्या उमेदवारांची पदस्थापना करण्यात आली होती. इतर बदलीप्राप्त कर्मचाऱ्यांना मात्र कोरोनामुळे बदली देता आली नव्हती. यंदाही मे महिन्यात कुणाच्याही बदल्या होऊ शकलेल्या नाहीत. त्यामुळे आता कर्मचाऱ्यांना जून २०२१ ची वाट पाहावी लागणार आहे.

कोरोनामुळे कोणत्याही प्रकारच्या बदल्या करण्यात येऊ नयेत, असे आदेश शासनाने काढलेले असले तरी सेवानिवृत्तीमुळे रिक्त होणारी पदे भरण्यासाठी तसेच अत्यावशयक सेवेतील कर्मचाऱ्यांच्या बदल्या मात्र करता येणार आहेत. गंभीर स्वरूपाच्या तक्रारीवरून एखाद्या कर्मचाऱ्याची बदली करणे आवश्यक ठरत असेल तर अशा कर्मचाऱ्यांची बदली या कालावधीत मात्र होऊ शकणार आहे.

दरम्यान, पुढील काही महिन्यात बदल्यांची प्रक्रिया राबविली जाण्याची शक्यता असली तरी प्रशासकीय बदल्यांपेक्षा अनेक कर्मचाऱ्यांनी विनंती बदलीची मागणी केली असल्याचे समजते.

Web Title: Staff transfers stalled for consecutive years

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.