सोयगावच्या स्वॅब संकलन केंद्रावर ८० हजार नमुन्यांचा टप्पा पूर्ण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 28, 2021 04:14 AM2021-07-28T04:14:56+5:302021-07-28T04:14:56+5:30
सोयगाव फायर स्टेशनमध्ये उघडण्यात आलेल्या स्वॅब संकलन केंद्रात शहरातील २३ स्वॅब सेंटरचे संकलन झाले. यात अली अकबर,वाडिया, कॅम्प हॉस्पिटल, ...
सोयगाव फायर स्टेशनमध्ये उघडण्यात आलेल्या स्वॅब संकलन केंद्रात शहरातील २३ स्वॅब सेंटरचे संकलन झाले. यात अली अकबर,वाडिया, कॅम्प हॉस्पिटल, कॅम्प सेंटर, सोयगाव, संगमेश्वर, सोमवार वॉर्ड, गुरुवार वॉर्ड, मदनीनगर, गयासनगर, आयएमए सेंटर, आयेशानगर, रमजामपुरा, गोल्डन नगर, सायने बु, निमा १ व एम.एस.जी. सेंटर, सहारा हॉस्पिटल, सामान्य रुग्णालय येथील स्वॅब संकलन झाले. आकडेवारी पाहता २१.२ टक्के रुग्ण महापालिका क्षेत्रात आढळून आले, असे सोयगाव संकलन केंद्राचे उमेश खैरनार यांनी सांगितले.
संकलन केंद्रांच्या प्रमुख लोथे, प्रयोगशाळा तंत्रज्ञ जय मोहिते यांनी योग्य नियोजन केल्याने नागरिकांची सोय झाली. १४ कर्मचाऱ्यांच्या चमुने नागरिकांना सहकार्य, मदत केली. दिवसरात्र काम करून कोरोना हटाव मोहिमेत त्यांनी महत्त्वाची भूमिका बजावली आहे.
कोरोनाकाळात संकलन केंद्रावर गर्दीवर नियंत्रण मिळविण्यात कर्मचाऱ्यांची मोठी दमछाक झाली. आजही दररोज आठ ते दहा जणांच्या स्त्रावाचे नमुने संकलित केले जातात. सध्या तरी अहवाल निगेटिव्ह येत असून, कोरोना लवकर संपुष्टात येईल, असे श्रीमती लोथे यांनी सांगितले.
इन्फो...
स्वॅब संकलन आकडेवारी
एकूण नमुने : ८०,८३३
कोरोनाबाधित - १७,०५९
निगेटिव्ह - ६५,५२३
प्रलंबित - १,२५१