सवंगडी संस्थेच्या वतीने पथनाट्य स्पर्धा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 11, 2020 12:14 AM2020-02-11T00:14:11+5:302020-02-11T01:09:34+5:30
सवंगडी संस्थेच्या माध्यमातून नाशिकमध्ये प्रथमच क्र ीडा व खेळ या विषयावर पथनाट्य स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेत पहिली ते चौथी आणि पाचवी ते आठवी अशा दोन गटांचा समावेश होता.
नाशिक : सवंगडी संस्थेच्या माध्यमातून नाशिकमध्ये प्रथमच क्र ीडा व खेळ या विषयावर पथनाट्य स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेत पहिली ते चौथी आणि पाचवी ते आठवी अशा दोन गटांचा समावेश होता.
कालिका देवी मंदिर संस्थानच्या प्रांगणात आयोजित या कार्यक्र मामध्ये कलाकारांनी सुंदर पथनाट्यांचे सादरीकरण केले. यामध्ये लहान गटात मध्यवर्ती हिंदू सैनिकी शिक्षण मंडळाच्या शिशु विहार या शाळेच्या कलाकारांनी मोबाइलचा दुरुपयोग आणि त्याचे बालकावर तसेच एकंदरीत समाजावर होणारे दुष्परिणाम याविषयी अगदी सुंदर नाट्य सादर केले.
कलाकारांना प्रमुख पाहुणे कालिका मंदिर देवी ट्रस्टचे अध्यक्ष केशव अण्णा पाटील व क्र ीडा अधिकारी अरविंद चौधरी यांच्या हस्ते चषक, प्रशस्तिपत्र व पुस्तक प्रदान करून त्यांचा गौरव करण्यात आला. त्याचबरोबर दिग्दर्शक व लेखक सपना कासार, प्रिती यावलकर यांचाही यावेळी गौरव करण्यात आला. यावेळी केशव अण्णा पाटील यांनी सांगितले की, या कलाकारांनी या पथनाट्याद्वारे फार योग्य विषयावर सुंदर असे सादरीकरण केले. या पथनाट्याचे परीक्षक म्हणून दिग्दर्शक रवी जन्नावार व क्र ीडा समीक्षक आनंद खरे यांनी काम बघितले. यावेळी या कार्यक्र माचे आयोजक नितीन हिंगमिरे यांनी सांगितले की, पथनाट्याच्या स्पर्धेत नाशिकच्या जास्तीत जास्त संस्था आणि शाळांनी यामध्ये सहभाग घ्यावा, अशी अपेक्षा व्यक्त केली. यावेळी सचिव दीपक बैचे, संगीता हिंगमिरे, शशांक वझे, वेदिका हिंगमिरे, गौरी बैचे, मनोजखैरनार आदींनी सहकार्य केले.