भुयारी मार्गावर साचले पाणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 30, 2021 08:56 PM2021-05-30T20:56:15+5:302021-05-31T00:41:41+5:30
पिंपळगाव बसवंत : परिसरात रविवारी (दि. ३०) सायंकाळी वादळी वाऱ्यासह विजांच्या कडकडाटासह जोरदार पाऊस बरसू लागला त्यामुळे घराबाहेर पडणाऱ्या नागरिकांची चांगलीच तारांबळ उडाली होती. पावसापासून लपण्यासाठी उड्डाणपुलाच्या भुयारी मार्गाचा आश्रय नागरिक घ्यायचे मात्र त्यात ठिकाणी देखील पाणी साचल्याने वाहनधारकांनी व नागरिकांना प्रवास धोक्याचा वाटत होता. येथे साचलेल्या तळ्यामुळे प्रशासनाच्या कामकाजावर नाराजी व्यक्त केली जात आहे.

पिंपळगाव बसवंत येथील चिंचखेड चौफुली जवळ असलेला उड्डाणपूल याला महाराष्ट्र बँकेसमोर भुयारी मार्ग ठेवण्यात आला आहे आणि विशेष म्हणजे आत्ताच नव्याने उड्डाणपुलाचे काम पूर्ण होऊन तो वाहतुकीसाठी खुला करण्यात आला आहे.
मात्र भुयारी मार्गाचे योग्य नियोजन न केल्याने पहिल्याच पावसात प्रशासनाची पोल-खोल झाल्याने येणाऱ्या संपूर्ण पावसाळ्यात काय परिस्थिती होईल यांची कल्पना वाहनधारक व नागरिक करु लागले आहेत.