इंदिरानगर जॉगिंग ट्रॅकवर साचले पाणी; आरोग्यास धोका
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 21, 2018 12:20 AM2018-07-21T00:20:25+5:302018-07-21T00:20:55+5:30
साईनाथनगर चौफुलीलगत असलेल्या जॉगिंग ट्रॅकमध्ये पावसाचे पाणी साचत असल्याने परिसरातील नागरिकांच्या आरोग्यास धोका निर्माण झाला आहे असून, काही दिवसांपूर्वीच या भागात डेंग्युसदृश आजाराचे तीन रुग्णं आढळून आले होते.
इंदिरानगर : साईनाथनगर चौफुलीलगत असलेल्या जॉगिंग ट्रॅकमध्ये पावसाचे पाणी साचत असल्याने परिसरातील नागरिकांच्या आरोग्यास धोका निर्माण झाला आहे असून, काही दिवसांपूर्वीच या भागात डेंग्युसदृश आजाराचे तीन रुग्णं आढळून आले होते. साईनाथनगर चौफुलीलगत असलेल्या जॉगिंग ट्रॅकवर अनेक ठिकाणी पावसाचे पाण्याचे डबके साचल्याने डासांचा प्रादुर्भाव वाढलेला आहे. जॉगिंग ट्रॅकलगत असलेल्या सत्यविहार आपार्टमेंटमध्ये काही दिवसांपूर्वी दोन डेंग्यूसदृश आजाराचे रुग्ण आढळून आले होते. त्याचबरोबर एका बंगल्यातदेखील एक डेंग्यूसदृश आजाराचा रुग्ण आढळून आला होता. त्यामुळे तातडीने जॉगिंग ट्रॅक परिसरात साचणाऱ्या पाण्याचा निपटारा करण्यासाठी उपयोजना करण्याची मागणी महेश गिरमे, तेजस कुलकर्णी, अनिकेत तिजारे, बाळू शिंदे, राजू ठोकळ, मोना पंचाक्षरी, शैलजा लावेकर, तिवारी, राजू ठोकळ, विजय तिजारे आदी नागरिकांनी केली आहे.