वडाळा रस्त्यावर साचले पाणी; नागरिकांचे हाल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 9, 2019 12:46 AM2019-07-09T00:46:12+5:302019-07-09T00:46:34+5:30
संततधार पावसाने वडाळागावच्या मुख्य रस्त्यावर पाण्याचे तळे साचत असल्याने वाहतूक विस्कळीत होत आहे. मिल्लतनगरपासून चिश्तिया कॉलनीपर्यंत वडाळा मुख्य रस्ता पाण्यात बुडाल्याचे चित्र आहे.
नाशिक : संततधार पावसाने वडाळागावच्या मुख्य रस्त्यावर पाण्याचे तळे साचत असल्याने वाहतूक विस्कळीत होत आहे. मिल्लतनगरपासून चिश्तिया कॉलनीपर्यंत वडाळा मुख्य रस्ता पाण्यात बुडाल्याचे चित्र आहे. येथील सखल भागात साचणाऱ्या पाण्याचा निचरा करण्याची मागणी महापालिकडे करण्यात आली आहे. रविवारी रात्री हा रस्ता संपूर्ण पाण्यात बुडला होता. रस्त्यावरून दुभाजकापर्यंत पाण्याची पातळी वाढली होती. त्यामुळे एकेरी वाहतूक करण्याची वेळ नागरिकांवर आली.
वडाळागाव रस्त्यालगत गोठ्यांमधील मलमूत्र वाहून नेणाºया गटारी असून, या गटारी सातत्याने तुंबतात. पावसाळ्यात गटारी ओसंडून रस्त्यावर वाहू लागतात. यामुळे परिसरात अस्वच्छता पसरते. सांडपाणी पावसाच्या पाण्याने वाहून जयदीपनगर, मिल्लतनगरजवळील मोकळ्या भूखंडांवर साचते. त्यामुळे या भागात डासांच्या उपद्रवात वाढ होऊन साथीचे आजार पसरण्याची भीती व्यक्त होत आहे. महापालिकेच्या सार्वजनिक बांधकाम विभाग, भुयारी गटार विभागाने येथे साचणाºया पावसाच्या पाण्यावर उपाय करण्याची मागणी होत आहे.