ठमके खुनातील संशयितांना कोठडी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 29, 2017 12:28 AM2017-10-29T00:28:22+5:302017-10-29T00:28:28+5:30

प्रेमसंबंधात अडसर ठरत असलेला दशरथ बाळू ठमके (२७, रा़ अवधूतवाडी, गजानन चौक, दिंडोरीरोड, पंचवटी) या युवकाचा खून करून मृतदेह पेठरोडवरील शरदचंद्र पवार बाजार समितीच्या टाकीत फेकून देणारे संशयित गणेश वसंत गरड (२१, रा़ नागचौक, जोशीवाडा, पंचवटी), राहुल ऊर्फ भुºया बाबूराव लिलके (१९, एरंडवाडी, चैतन्य म्हसोबा चौक, पंचवटी), उमेश डॅनियल खंदारे (२७, मायको दवाखान्याजवळ, पंचवटी), श्याम मधुकर बागुल (३१, रा़ गजानन चौक, सम्राटनगर, पंचवटी) या चौघांना शनिवारी (दि़२८) न्यायालयात हजर केले असता २ नोव्हेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली़

Stalker suspects hacked | ठमके खुनातील संशयितांना कोठडी

ठमके खुनातील संशयितांना कोठडी

Next

नाशिक : प्रेमसंबंधात अडसर ठरत असलेला दशरथ बाळू ठमके (२७, रा़ अवधूतवाडी, गजानन चौक, दिंडोरीरोड, पंचवटी) या युवकाचा खून करून मृतदेह पेठरोडवरील शरदचंद्र पवार बाजार समितीच्या टाकीत फेकून देणारे संशयित गणेश वसंत गरड (२१, रा़ नागचौक, जोशीवाडा, पंचवटी), राहुल ऊर्फ भुºया बाबूराव लिलके (१९, एरंडवाडी, चैतन्य म्हसोबा चौक, पंचवटी), उमेश डॅनियल खंदारे (२७, मायको दवाखान्याजवळ, पंचवटी), श्याम मधुकर बागुल (३१, रा़ गजानन चौक, सम्राटनगर, पंचवटी) या चौघांना शनिवारी (दि़२८) न्यायालयात हजर केले असता २ नोव्हेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली़  मयत दशरथ ठमके याच्या पत्नीचे संशयित गणेश गरडसोबत प्रेमसंबंध होते़ या कारणावरून ठमके याने गरडला समज दिल्यानंतर संतप्त झालेल्या गरड याने आपल्या तिघा साथीदारांसमवेत पार्टीच्या बहाण्याने ठमकेला शनिवारी (दि़२१) रात्री पेठरोडवरील शरदचंद्र पवार बाजार समितीलगतच्या मोठ्या जलकुंभाजवळ घेऊन गेले़ या ठिकाणी मद्याच्या नशेत असलेल्या ठमकेवर या चौघांनी धारदार शस्त्राने वार करून त्याचा खून केला़ यानंतर मृतदेह विल्हेवाट लावण्यासाठी तो पाण्याच्या टाकीत टाकला़ यानंतर ठमकेच्या भावाने बेपत्ता असल्याची तक्रार पंचवटी पोलिसांत दाखल केल्यानंतर तपासादरम्यान खून केल्याचे शुक्रवारी (दि़२७) उघडकीस आले़
पंचवटी पोलिसांनी या चौघांवर खुनाचा गुन्हा दाखल करून अटक केली होती़
टाकीतून पाणीपुरवठा नाही
सदर मृतदेह हा महापालिकेच्या जलकुंभात नव्हे तर कृउबाच्या साठवलेल्या पाण्याच्या टाकीत टाकण्यात आलेला होता. त्यामुळे दैनंदिन पाणीपुरवठ्याशी या टाकीचा संबंध नसल्याची माहिती विभागीय अधिकारी राजेंद्र गोसावी यांनी दिली.

Web Title: Stalker suspects hacked

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.