जलयुक्तची कामे करणाऱ्या ठेकेदारांना तंबी
By admin | Published: May 15, 2015 12:21 AM2015-05-15T00:21:14+5:302015-05-15T00:21:48+5:30
जलयुक्तची कामे करणाऱ्या ठेकेदारांना तंबी
नाशिक : जिल्'ात जलयुक्त शिवार योजनेंतर्गत दीडशे सीमेंटचे बंधारे बांधण्यात येणार असून, कामासाठी असलेला शिल्लक कालावधी पाहता मुदतीत काम पूर्ण करताना त्या कामाची गुणवत्ता व दर्जा राखण्याची जबाबदारी ठेकेदारांचीच असून, कोणत्याही क्षणी कोणत्याही कामाची पाहणी करताना जेसीबीचा वापर करण्यात येईल, अशी तंबी जिल्हाधिकाऱ्यांनी ठेकेदारांना भरली आहे. ३० जूनपर्यंत कामे पूर्ण करण्यात आल्यानंतर मुख्यमंत्र्यांकडून या कामांची पाहणी केली जाईल, असे त्यांनी सांगितले.
गुरुवारी जलयुक्त शिवार योजनेचे कामे करणाऱ्या ठेकेदारांची बैठक जिल्हाधिकारी कार्यालयात घेण्यात आली. त्यावेळी त्यांना कामांसाठी लागणाऱ्या कालावधीबाबत चर्चा करण्यात आली. साधारणत: दरवर्षी पाणीटंचाई भासणाऱ्या गावांचीच या कामांसाठी निवड करण्यात आली असून, पावसाळ्यात तलावांमध्ये पाणी साठेल, परंतु त्यासाठी बंधाऱ्याच्या कामांची गुणवत्ता राखली जावी अशी अपेक्षा व्यक्त केली. ज्या ठिकाणी गाळ काढण्याचे काम सुरू आहे, त्याठिकाणी मजुरांची संख्या चौपट वाढविण्यात यावी व पुढील काम करण्यासाठीचे साहित्य आगावू मागवून सीमेंट कामासाठी लागणाऱ्या दिवसांचे नियोजन केले जावे त्यासाठी विनाकारण वेळ दवडू नये अशा सूचना करण्यात आल्या आहेत. ३० जूनपर्यंत कामे पूर्ण केल्यानंतर कोणत्याही क्षणी कामांची तपासणी करण्यात येणार आहे, त्यात दोषी आढळलेल्या ठेकेदारांवर कारवाई केली जाईल, अशी तंबीही त्यांनी दिली. जलयुक्त शिवार योजनेच्या कामांची जिल्हाधिकारी पाहणी करणार असल्याचे सांगून सांगली जिल्'ात आपण केलेल्या सीमेंट बंधाऱ्यांमधून एक थेंबही पाणी झिरपत नाही, तोच पॅटर्न नाशिक जिल्'ात राबविण्याचा मानस त्यांनी बोलून दाखविला.