स्थायी समितीच्या  सदस्यांचा आज फैसला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 28, 2019 12:57 AM2019-02-28T00:57:24+5:302019-02-28T00:57:41+5:30

महापालिका स्थायी समितीच्या सात जागांसाठी गुरुवारी (दि.२८) विशेष महासभा होत आहे. महापालिकेतील सर्वांत सक्षम असलेल्या या समितीच्या सदस्यत्वासाठी भाजपा आणि सेनेत मोठ्या प्रमाणात व्यूहरचना सुरू आहे. भाजपात तर रात्री उशिरापर्यंत खल सुरू होता.

 Standing Committee members decide today | स्थायी समितीच्या  सदस्यांचा आज फैसला

स्थायी समितीच्या  सदस्यांचा आज फैसला

Next

नाशिक : महापालिका स्थायी समितीच्या सात जागांसाठी गुरुवारी (दि.२८) विशेष महासभा होत आहे. महापालिकेतील सर्वांत सक्षम असलेल्या या समितीच्या सदस्यत्वासाठी भाजपा आणि सेनेत मोठ्या प्रमाणात व्यूहरचना सुरू आहे. भाजपात तर रात्री उशिरापर्यंत खल सुरू होता.
उच्च न्यायालयाच्या आदेशामुळे आठ ऐवजी सात सदस्यांची निवड विशेष महासभेत होणार आहे. दुपारी तीन वाजता ही सभा होणार आहे. भाजपाचे चार सदस्य अगोदरच राजीनामा देत नसताना आता नवीन सदस्य निवडण्यासाठीदेखील जोरदार रस्सीखेच सुरू आहे. भाजपाचे संघटनमंत्री किशोर काळकर हे सायंकाळी शासकीय विश्रामगृहावर दाखल झाल्यानंतर रात्री उशिरापर्यंत खल सुरू होता. यात सदस्यपदासाठी गटनेता संभाजी मोरूस्कर, गणेश गिते, कमलेश बोडके यांची पूर्व नाशिक मतदारसंघातून, मध्यमधून स्वाती भामरे व सतीश सोनवणे आणि पश्चिममधून वर्षा भालेराव यांची नावे चर्चेत होती. तीन आमदारांना भाजपा कोटा पद्धतीने संधी देत असला तरी पालकमंत्री गिरीश महाजन हेदेखील निर्णायक ठरणार आहेत. दुपारी १२ वाजेपर्यंत नावे निश्चित होण्याची शक्यता आहे.
शिवसेनेच्या वतीने इच्छुकांची नावे संपर्क प्रमुख भाऊसाहेब चौधरी यांना सादर करण्यात आली असून, गुरुवारी सकाळी मुंबईहून लखोटा येणार असल्याचे सांगण्यात येत आहे. मनसेच्या एका सदस्याचे नाव स्थानिक स्तरावरूच ठरणार असल्याचे वृत्त आहे.
आमदारांची परीक्षा
स्थायी समिती सदस्यत्वासाठी मोजक्याच सदस्यांची नावे अंतिम टप्प्यात असली तरी भाजपात मोठ्या प्रमाणात इच्छुक आहेत. विविध समित्यांची पदे भूषविणाऱ्यांना पक्षाने बाद ठरविले असले तरी इच्छुकांची संख्या कमी होत नाही. त्यामुळे आमदारांची डोकेदुखी वाढली आहे.

Web Title:  Standing Committee members decide today

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.