आमदारांंच्या महिला रुग्णालयाचा प्रस्ताव स्थायी समितीने रोखला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 22, 2018 01:13 AM2018-09-22T01:13:59+5:302018-09-22T01:14:13+5:30

भाजपाच्या मध्य नाशिकच्या आमदार देवयानी फरांदे यांनी प्रतिष्ठेच्या केलेल्या भाभानगर येथील जागेतच महिला रुग्णालय साकारण्याचा प्रस्ताव शुक्रवारी(दि. २१) स्थायी समितीवर सादर झाला खरा परंतु भाजपाचे बहुमत असलेल्या समितीने तो शिवसेनेच्या विरोधानंतर सभापती हिमगौरी आडके यांनी तो अभ्यासासाठी तहकूब केला.

 The Standing Committee proposes the proposal of women's hospital for MLAs | आमदारांंच्या महिला रुग्णालयाचा प्रस्ताव स्थायी समितीने रोखला

आमदारांंच्या महिला रुग्णालयाचा प्रस्ताव स्थायी समितीने रोखला

googlenewsNext

नाशिक : भाजपाच्या मध्य नाशिकच्या आमदार देवयानी फरांदे यांनी प्रतिष्ठेच्या केलेल्या भाभानगर येथील जागेतच महिला रुग्णालय साकारण्याचा प्रस्ताव शुक्रवारी(दि. २१) स्थायी समितीवर सादर झाला खरा परंतु भाजपाचे बहुमत असलेल्या समितीने तो शिवसेनेच्या विरोधानंतर सभापती हिमगौरी आडके यांनी तो अभ्यासासाठी तहकूब केला.  आमदार फरांदे यांनी महिला रुग्णालयासाठी निधी मंजूर करून आणल्यानंतर ते भाभानगर येथे म्हणजेच कर्मवीर दादासाहेब गायकवाड सभागृहाच्या बाजूच्या जागेत करण्याचा प्रस्ताव दिला होता, मात्र त्यास भाजपाचेच प्रदेश उपाध्यक्ष वसंत गिते यांचा विरोध होता. परिसरातील नागरिकांनी यासंदर्भात आयुक्तांना निवेदन दिले होते. त्यानंतर टाकळी येथील जागा महापालिकेने सुचवली होती, मात्र फरांदे यांनी भाभानगर येथील जागेसाठी प्रतिष्ठेचा प्रश्न केला होता अखेरीस शासकीय निधीतून आणि संपूर्णत: शासकीय दायित्व असलेला हा प्रस्ताव चर्चेसाठी आल्यानंतर दिनकर पाटील आणि मुशीर सय्यद यांनी त्यांचे समर्थन केले, परंतु शिवसेनेच्या प्रवीण तिदमे आणि भागवत आरोटे यांनी त्यास विरोध केला. दादासाहेब गायकवाड सभागृहाची पार्किंग ज्या जागेत आहे, त्याच ठिकाणी अशाप्रकारचे रुग्णालय उभारल्यानंतर वाहनतळाचे काय होणार त्याचप्रमाणे सदरच्या जागेत असलेले पूर्वीचे आरक्षण बदलण्यात आले आहे काय? असे प्रश्न विचारतानाच सदरचा विषय न्यायप्रविष्ट असल्याने त्याबाबतदेखील त्यांनी विचारणा केली. जागेवरील आरक्षणाबाबत नगररचना विभागाचे सहायक संचालक सुरेश निकुंभे यांना थेट उत्तर देता न आल्याने आयुक्त तुकाराम मुंढे यांनी खुलासा करताना या जागाचे आरक्षण बदलण्यात आले असून त्यात रुग्णालय उभे राहू शकतो. गायकवाड सभागृहाच्या वाहनतळाचा प्रश्न निर्माण होऊ शकतो, असे त्यांनी मान्य करतानाच रुग्णालयाच्या प्रस्तावित इमारतीत वाहनतळासाठी आवश्यक ती जागा असल्याचेदेखील स्पष्ट केले. मात्र आयुक्तांच्या या खुलाशानंतरदेखील शिवसेनेच्या सदस्यांनी याबाबत माहिती घेतली पाहिजे तसेच चौकशीदेखील करणे गरजेचे असल्याचे सांगितल्यानंतर हा प्रस्ताव आडके यांनी स्थगित केला. दरम्यान, अंगणवाडीतील सुविधांवरून नगरसेवकांनी चर्चा केली.
पाटील-हिमगौरी आडके यांची खडाजंगी
भाभानगर येथील महिला रुग्णालयाच्या विषयावरून दिनकर पाटील यांनी गंगापूर येथील रुग्णालये बंद का? असा प्रश्न करणाऱ्या दिनकर पाटील यांना सभापती हिमगौरी आडके यांनी थांबवण्याचा आणि तिदमे यांना बोलण्याचा इशारा केल्याने पाटील संतप्त झाले आणि त्यांनी आडके यांच्यावर रोष व्यक्त केला. आपण जनतेच्या कामांचेच बोलत असताना कशासाठी थांबवतात? असा प्रश्न करीत तुम्ही काल परवा पदावर निवडून आल्या आहेत, आमचे आयुष्य चालले आहे, तुमच्या एवढी मला मुलगी आहे. पदाचा नाही तर वयाचा तर मान राखत जा असे समितीत सुनावल्याने सारेच आवाक झाले. मात्र, आडके यांनी शांततेत सभापती म्हणून मलाच अधिकार आहेत तसेच समितीत सर्वांनाच समान संधी द्यावी लागते असे सांगितले, परंतु पाटील ऐकण्याच्या मन:स्थितीत नव्हते. त्यांनी सभात्याग केला, परंतु जाताना आता तुमच्या चौकशाच लावतो, असा इशाराही दिला.
समितीत मंजूर ठळक विषय
अधिकाºयांच्या वित्तीय अधिकारात वाढ.
पंचवटी- सातपूर विभागातील अंगणवाड्यांच्या दुरुस्तीसाठी ८० लाख रुपये
गंगापूर धरणावर पंप सेट बसवण्यासाठी २ कोटी ६३ लाख.
सातपूर विभागात मलवाहिका टाकण्यासाठी १८ कोटी ३४ लाख.
पंचवटी विभागात मलवाहिकांच्या कामांसाठी १६ कोटी ५२ लाख.
आयुक्त स्थायीला पावले
विविध कामांच्या कंत्रांटाचे विषयच नसल्याने अनेकदा स्थायी समितीची बैठक होत नाही अशी स्थिती असताना शुक्रवारी (दि.२१) समितीच्या बैठकीत कोट्यवधी रुपयांचे विषय मांडण्यात आले होते.

Web Title:  The Standing Committee proposes the proposal of women's hospital for MLAs

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.