वसाका कार्यस्थळावर शेतकऱ्यांचा ठिय्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 24, 2018 12:12 AM2018-04-24T00:12:36+5:302018-04-24T00:12:36+5:30
वसंतदादा पाटील सहकारी साखर कारखान्यास ऊसपुरवठा करूनही अद्याप उसाचे बिल ऊस उत्पादकांना मिळाले नसल्याने स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष गोविंद पगार व वसाका बचाव परिषदेचे निमंत्रक सुनील देवरे यांच्या नेतृत्वाखाली ऊस उत्पादकांनी वसाका कार्यस्थळावर दोन तास ठिय्या आंदोलन करून प्रशासनाचे लक्ष वेधून घेतले. खातेप्रमुखांना व कर्मचाºयांना कार्यालयात कोंडून ठेवण्याचा प्रयत्न यावेळी करण्यात आला.
कळवण : वसंतदादा पाटील सहकारी साखर कारखान्यास ऊसपुरवठा करूनही अद्याप उसाचे बिल ऊस उत्पादकांना मिळाले नसल्याने स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष गोविंद पगार व वसाका बचाव परिषदेचे निमंत्रक सुनील देवरे यांच्या नेतृत्वाखाली ऊस उत्पादकांनी वसाका कार्यस्थळावर दोन तास ठिय्या आंदोलन करून प्रशासनाचे लक्ष वेधून घेतले. खातेप्रमुखांना व कर्मचाºयांना कार्यालयात कोंडून ठेवण्याचा प्रयत्न यावेळी करण्यात आला. वसाकाला ऊस देणाºया सर्व ऊस उत्पादकांचे ऊस बिल १० मेपर्यंत शेतकºयांच्या बँक खात्यात वर्ग करण्याचे स्पष्ट आश्वासन वसाकाचे मुख्य प्राधिकृत अधिकारी आमदार डॉ. राहुल अहेर यांनी दिल्यानंतर दोन तासांनंतर आंदोलन स्थगित करण्यात आले. यावेळी वसाकाचे कार्यालय अधीक्षक सोनवणे यांना वसाका बचाव परिषद व ऊस उत्पादकांच्या वतीने निवेदन देण्यात आले. दरम्यान, वसाका कारखान्यावर ठिय्या आंदोलन सुरू असताना कार्यालयीन कामकाज संपवून बाहेर पडणाºया कर्मचारी व खातेप्रमुखांना कार्यालयात कोंडण्याचा प्रयत्न संतप्त ऊस उत्पादक शेतकºयांनी केला. आंदोलक नेत्यांच्या मध्यस्थीनंतर कर्मचारी व खातेप्रमुखांची सुटका झाली. वसाका कारखान्यास ऊस पुरवठा केल्यानंतर उसाचे बिल न देता व्यवस्थापनाकडून उडवाउडवीची उत्तरे दिली जात असल्याने वसाका बचाव परिषदेच्या वतीने वसाका कार्यस्थळावर ऊस उत्पादक शेतकरी सभेचे आयोजन करण्यात आले होते. या आंदोलनात ऊस उत्पादक मुरलीधर पगार, दशरथ पगार, प्रभाकर पाटील, नंदू निकम, रवींद्र अहेर, तानाजी निकम, बाजीराव शिंदे, आनंद शिंदे, देवीदास निकम, दशरथ देशमुख, सुदर्शन पाटील, काकाजी साळवे, निंबा निकम, किशोर देशमुख, वसंत पाटील, प्रकाश देशमुख, नामदेव कनोज, चाळीसगाव येथील प्रशांत पाटील, दौलत पाटील, देवीदास देवरे यांच्यासह शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.