नाट्य परिषदेच्या एकांकिका स्पर्धेत ‘स्टार’ची बाजी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 26, 2022 01:15 AM2022-05-26T01:15:36+5:302022-05-26T01:16:02+5:30
अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद, नाशिक शाखेच्या स्व. अनंत कुबल राज्यस्तरीय नवव्या एकांकिका स्पर्धेच्या निकालांची घोषणा आणि पुरस्कार वितरणाचा सोहळा मध्यरात्री १२ वाजता पार पडला. या स्पर्धेत टिटवाळ्याच्या जिराफ थिएटरच्या ‘स्टार’ या एकांकिकेने बाजी मारली.
नाशिक : अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद, नाशिक शाखेच्या स्व. अनंत कुबल राज्यस्तरीय नवव्या एकांकिका स्पर्धेच्या निकालांची घोषणा आणि पुरस्कार वितरणाचा सोहळा मध्यरात्री १२ वाजता पार पडला. या स्पर्धेत टिटवाळ्याच्या जिराफ थिएटरच्या ‘स्टार’ या एकांकिकेने बाजी मारली.
सोमवारपासून बुधवारपर्यंत तीन दिवस महाकवी कालिदास कलामंदिरात ही स्पर्धा रंगली. या स्पर्धेत डोंबिवलीच्या कलरफुल मंक संस्थेचे ‘टिनिटस’ ने व्दितीय तर श्रीरामपूरच्या श्री थिएटर्सचे ‘अच्छे दिन वाे चार दिन’ ने तृतीय क्रमांक पटकावला. सर्वोत्तम अभिनयाचा पुरस्कार अनिल आव्हाड यांना, व्दितीय गणेश मगरे, तृतीय आदित्य खेडेकर यांना तर महिलांमध्ये शिवानी नाईक, मोनिका पाटील आणि मनाली राजश्री यांना प्रदान करण्यात आला. दिग्दर्शनाचा प्रथम पुऱस्कार स्टार नाटकासाठी राकेश जाधव यांना, अच्छे दिनसाठी व्दितीय अजय घोगरे यांना तर टिनिट्स नाटकासाठी नचिकेतला तृतीय पुरस्कार प्रदान करण्यात आला. पुरस्कार वितरणप्रसंगी व्यासपीठावर नाट्य परिषदेचे अध्यक्ष प्रा. रवींद्र कदम, उपाध्यक्ष डॉ. अनिरुद्ध धर्माधिकारी आणि प्रमुख कार्यवाह सुनील ढगे आदी उपस्थित होते.