२१ अंमलदारांच्या खांद्यावर चमकले तारे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 4, 2021 04:12 AM2021-06-04T04:12:56+5:302021-06-04T04:12:56+5:30
पोलीस महासंचालक कार्यालयाकडून प्राप्त झालेल्या आदेशानुसार विभागीय अर्हता परीक्षा २०१३ साली उत्तीर्ण करणाऱ्या पोलीस अंमलदारांपैकी निवड यादीमधील पोलीस आयुक्तालयातील ...
पोलीस महासंचालक कार्यालयाकडून प्राप्त झालेल्या आदेशानुसार विभागीय अर्हता परीक्षा २०१३ साली उत्तीर्ण करणाऱ्या पोलीस अंमलदारांपैकी निवड यादीमधील पोलीस आयुक्तालयातील एकूण २१ अंमलदारांना पोलीस उपनिरीक्षकपदी बढती देण्यात आली. यामध्ये १२ सहायक उपनिरीक्षक, ९ हवालदार यांचा समावेश आहे. दरम्यान, नवनिर्वाचित पोलीस उपनिरीक्षकांपैकी काहींची शहरातील पंचवटी, अंबड, नाशिकरोड, भद्रकाली, उपनगर, म्हसरुळ, मुंबईनाका, देवळाली कॅम्प, आडगाव या पोलीस ठाण्यांसह पोलीस नियंत्रण कक्ष, शहर वाहतूक शाखा, आर्थिक गुन्हे शाखा, विशेष शाखा, गुन्हे शाखा अशा वेगवेगळ्या ठिकाणी तत्काळ नियुक्तीही करण्यात आली.
दरम्यान, आयुक्तालयातील दुसऱ्या मजल्यावरील सभागृहात पोलीस आयुक्त दीपक पाण्डे्य, उपआयुक्त पौर्णिमा चौगुले-श्रींगी, अमोल तांबे, सहायक आयुक्त महेंद्र चव्हाण आदी अधिकाऱ्यांच्याहस्ते नवनियुक्त उपनिरीक्षकांच्या खांद्यावर दोन स्टार आणि लाल फित लावण्यात आली. यावेळी अधिकाऱ्यांचे कुटुंबीयदेखील या सोहळ्याला हजर होते. दरम्यान, आयुक्तालयाकडून उपस्थितांकरिता अल्पोहाराचीही व्यवस्था या ठिकाणी करण्यात आली होती.
यांना मिळाली पदोन्नती...
आयुक्तालयातील सहायक उपनिरीक्षक राम सहादू घोरपडे, विष्णू भास्कर उगले, राजेंद्र निवृत्ती वाघ, उत्तम राजाराम सोनवणे, शाम सोनाजी जाधव, देविदास शिवाजी भालेराव, संजय आणाजी कुलकर्णी, वसंत पगार, सदानंद शांताराम पुराणिक, रामदास भीमा गुरव यांच्यासह हवालदार संजय वामन बागुल, चंद्रकांत दत्तात्रय बोडके, लियाकत युसुफखान पठाण, रमेश त्र्यंबक पवार, दिलीप संपत मते, संजय सदाशिव भिसे, शांताराम राजाराम वाघ, युनुस रहीम शेख, रमेश गोविंदराव घडवजे, रामदास दामोदर सानप यांना पदोन्नती देण्यात आली.
---
फोटो कॅप्शन :
आयुक्तालयातील पदोन्नती मिळालेल्या पोलीस उपनिरीक्षकांसमवेत दीपक पाण्डेय, पौर्णिमा चौगुले-श्रींगी आदी.
===Photopath===
030621\03nsk_59_03062021_13.jpg
===Caption===
आयुक्तालयातील पदोन्नती मिळालेल्या पोलीस उपनिरिक्षकांसमवेत दीपक पाण्डेय, पौर्णिमा चौगुले-श्रींगी आदी.