भुसार लिलावास प्रारंभ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 26, 2019 10:42 PM2019-11-26T22:42:42+5:302019-11-26T22:44:07+5:30
वडाळीभोई : पहिल्याच दिवशी मक्याला १७३१ रुपये दर चांदवड : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या कार्यक्षेत्रातील शेतकरी बांधवांच्या मागणीनुसार व व्यापाऱ्यांशी झालेल्या बैठकीत ठरल्यानुसार वडाळीभोई येथे सोमवारपासून (दि. २५) भुसार माल लिलावाचा शुभारंभ संचालक विलास ढोमसे यांच्या हस्ते करण्यात आला. शेतकऱ्यांना भुसार माल विक्रीसाठी जवळची बाजारपेठ उपलब्ध झाली आहे.

यावेळी बाजार समितीचे संचालक विक्रम मार्कंड, सुरेश जाधव, सचिव जे.डी. आहेर, जी.एन. गांगुर्डे, डी.पी. आहेर, व्यापारी रमेश संचेती, गणेश शिरसाठ, दीपक जाधव आदींसह बाजार समिती अधिकारी, कर्मचारी व शेतकरी उपस्थित होते. बाजार समितीचे मुख्य बाजार आवार चांदवड, उपबाजार आवार वडाळीभोई व शेतीमाल खरेदी-विक्र ी केंद्र रायपूर येथे नियमित भुसार शेतमालाचा लिलाव सुरू असून, माल विक्री केल्यानंतर रोख रक्कम मिळण्याची हमी आहे. शिवार खरेदीत माल विक्री केल्यास फसवणूक होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे शेतकरी बांधवांनी आपला भुसार (मका, सोयाबीन, हरभरा) शेतमाल सुकवून व प्रतवारी करूनच मुख्य बाजार आवार चांदवड, वडाळीभोई व रायपूर येथे विक्रीस आणावा, असे आवाहन सभापती डॉ. आत्माराम कुंभार्डे, उपसभापती नितीन आहेर व संचालकांनी केले आहे.वडाळीभोई येथे पहिल्याच दिवशी एक हजार क्विंटल मका शेतमालाची आवक झाली. विक्रीस आलेल्या मालाची आर्द्रता जास्त असल्याने (नॉन फॉक) दर्जाच्या मका शेतमालास १४०० ते १७३१, तर सरासरी १६०० व सोयाबीनला ३६३० पर्यंत बाजारभाव मिळाला.