बंगाली बांधवांच्या दुर्गा महोत्सवाला प्रारंभ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 17, 2018 12:31 AM2018-10-17T00:31:34+5:302018-10-17T00:31:58+5:30
शहरातील बंगाली बांधवांच्या वतीने दुर्गापूजा उत्सवाचे आयोजन करण्यात आले असून, सोमवारी गंगापूररोडच्या नंदनवन लॉन्स येथे बंगा संजोग फाउंडेशनच्या वतीने मोठ्या उत्साहात दुर्गापूजा उत्सवाला प्रारंभ झाला.
गंगापूररोड : शहरातील बंगाली बांधवांच्या वतीने दुर्गापूजा उत्सवाचे आयोजन करण्यात आले असून, सोमवारी गंगापूररोडच्या नंदनवन लॉन्स येथे बंगा संजोग फाउंडेशनच्या वतीने मोठ्या उत्साहात दुर्गापूजा उत्सवाला प्रारंभ झाला. नंदनवन लॉन्सच्या अन्नपूर्णा हॉल येथे दुर्गा देवीच्या देखण्या मूर्तीची प्रतिष्ठापना करण्यात आली. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून आमदार देवयानी फरांदे व आयकर आयुक्त असिम कुमार उपस्थित होते. महाशष्टी, महासप्तमी, महाअष्टमी, महानवमी, महादशमीच्या दिवशी दुर्गादेवीची रोज आरती व पूजा, पुष्पांजली, संध्या आरती, अपराजिता दधीकर्मा, दर्पण विसर्जन आदी कार्यक्रम होतील. महाप्रसाद भोग रोज दुपारी एक वाजेपासून ते अडीच वाजेपर्यंत देण्यात येणार आहे. ही मूर्ती कोलकात्याच्या कलावंतांकडून तयार करण्यात आली असून, गणपती, कार्तिकस्वामी, लक्ष्मी आणि सरस्वतीचीही मूर्ती प्रतिष्ठापणा करण्यात आली आहे. विविध धार्मिक कार्यक्रमांचे तीन दिवस रेलचेल असणार आहे. मंगळवारी संध्याकाळी महिलांनी पारंपरिक पध्दतीने आरती केली. तसेच सांस्कृतिक कार्यक्रम सादर झाले.