भाजपाच्या स्वच्छता सेवा संवाद पदयात्रेला प्रारंभ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 2, 2018 06:01 PM2018-10-02T18:01:36+5:302018-10-02T18:02:53+5:30

मालेगाव शहर व तालुक्यात महात्मा गांधी स्वच्छता सेवा संवाद पदयात्रेला प्रारंभ झाला आहे. या यात्रेदरम्यान कॅम्प परिसरात स्वच्छता मोहीम, शासकीय योजनांची माहिती देण्यात आली. २ आॅक्टोबर ते ३० जानेवारी २०१९ दरम्यान पदयात्रा काढण्यात येणार असल्याची माहिती भाजपाचे महानगर प्रमुख सुनील गायकवाड यांनी पत्रकार परिषदेत दिली.

 Start of BJP's Cleanliness Services Dialogue | भाजपाच्या स्वच्छता सेवा संवाद पदयात्रेला प्रारंभ

भाजपाच्या स्वच्छता सेवा संवाद पदयात्रेला प्रारंभ

Next

भाजपाच्या वतीने महात्मा गांधी स्वच्छता सेवा संवाद पदयात्रेचे आयोजन करण्यात आले आहे. शहरातील कॅम्प भागातील स्वच्छता मोहिमेला सुरूवात झाली. मंगळवारी कॅम्पातील तलाठी कार्यालय, मेन रोड, मोची कॉर्नर परिसरात भाजपाचे पदाधिकारी व कार्यकर्ते, मनपा कर्मचाऱ्यांनी स्वच्छता मोहीम राबविली. दर रविवारी स्वच्छता मोहीम राबविली जाणार आहे. पदयात्रा काळात शहर व तालुक्यात दीडशे किलोमीटर प्रवास करून स्वच्छता मोहीम व शासकीय योजनांची माहिती दिली जाणार आहे. महात्मा गांधींच्या विचारांची जनजागृती केली जाणार आहे. महात्मा गांधींनी दिलेल्या ‘खेड्याकडे चला’चा संदेश, स्वच्छता मोहिमेची प्रभावीपणे अंमलबजावणी केली जाणार असल्याची माहिती गायकवाड यांनी दिली. पत्रकार परिषदेला प्रदेश कार्यकारिणी सदस्य नितीन पोफळे, नगरसेवक गजू देवरे, विवेक वारूळे, दुर्गेश कोते, आप्पा साबणे आदि उपस्थित होते.

Web Title:  Start of BJP's Cleanliness Services Dialogue

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.