येवला रेल्वेस्थानकावर बुकिंग काउंटर सुरू करा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 8, 2021 04:41 AM2021-01-08T04:41:13+5:302021-01-08T04:41:13+5:30
येवला : येथील रेल्वेस्थानकप्रश्नी भाजपच्या वतीने खासदार डॉ. भारती पवार यांना विविध मागण्यांचे निवेदन देण्यात आले. येवला रेल्वेस्थानकावर पीआरएस ...
येवला : येथील रेल्वेस्थानकप्रश्नी भाजपच्या वतीने खासदार डॉ. भारती पवार यांना विविध मागण्यांचे निवेदन देण्यात आले.
येवला रेल्वेस्थानकावर पीआरएस बुकिंग काउंटर पूर्ववत सुरू करावे. दुसरा फलाट तयार करून त्याला जोडणारा पूल तयार करून तो तत्काळ वापरासाठी उपलब्ध करून द्यावा. झेलम एक्स्प्रेस, गोवा एक्स्प्रेस, कर्नाटक एक्स्प्रेस अशा जवळपास ३० ते ३५ रेल्वेगाड्यांची येवला स्थानकाहून ये-जा असते. त्यातील काही गाड्यांना का होईना येवला स्थानकावर थांबा देण्यात यावा, आदी मागण्या निवेदनात करण्यात आल्या आहेत.
सध्या गोंदियावरून येणारी महाराष्ट्र एक्स्प्रेस ४ नंबर फलाटावर उभी राहते. मात्र, त्या ठिकाणी फलाट नसल्याने प्रवाशांना चढण्याउतरण्यासाठी गैरसोय होते. तर, रूळ ओलांडताना खूपच त्रास होतो. यासाठी दुसरा फलाट तातडीने होणे आवश्यक असल्याचे यावेळी धनंजय कुलकर्णी, शहराध्यक्ष तरंग गुजराथी यांनी सांगितले.
निवेदनावर नगराध्यक्ष बंडू क्षीरसागर, नगरसेवक प्रमोद सस्कर, येमको चेअरमन बापू काळे, पुरुषोत्तम रहाणे, बापू गाडेकर, राजू परदेशी, महेश वडे, संतोष सासे, बाळ साताळकर, डॉ. संतोष जाधव, कुंदन हजारे, वैभव खेरूड आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत. (०७ येवला २)
===Photopath===
070121\07nsk_3_07012021_13.jpg
===Caption===
०७ येवला २