ग्रामीण भागातील जलकुंभांच्या स्वच्छतेला प्रारंभ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 3, 2021 04:12 AM2021-06-03T04:12:05+5:302021-06-03T04:12:05+5:30
दरम्यान, जिल्हा पाणी व स्वच्छता विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी इशाधीन शेळकंदे यांनी देवळा तालुक्यातील उमराणे येथे भेट देऊन जलकुंभ ...
दरम्यान, जिल्हा पाणी व स्वच्छता विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी इशाधीन शेळकंदे यांनी देवळा तालुक्यातील उमराणे येथे भेट देऊन जलकुंभ स्वच्छता अभियान कामांची पाहणी केली, यावेळी गट विकास अधिकारी राजेश देशमुख, विस्तार अधिकारी जे. एस. भामरे आदी उपस्थित होते. बागलाण तालुक्यातील नामपूर, नळकस व अंबासन येथेही जलकुंभ स्वच्छता अभियान तसेच स्वच्छतेविषयक कामांची पाहणी करून आढावा घेण्यात आला.
सदरचे अभियान यशस्वीपणे राबविण्यासाठी ग्रामपंचायतींनी सर्व पिण्याच्या पाण्याच्या टाक्या पूर्णपणे स्वच्छ करून त्यावर शुद्धीकरण करण्याची तारीख ऑइलपेंटने नमूद करावी, तसेच सर्व ग्रामपंचायतीमध्ये एक कोरडा दिवस पाळण्यात यावा व पावसाळ्यात पुरेशा प्रमाणात टीसीएल उपलब्ध राहील यासाठी दक्षता घेण्याचे आवाहन शेळकंदे यांनी केले आहे.
(फोटो ०२ हातपंप)