शेतकरी कुटुंबांची माहिती गोळा करण्यास प्रारंभ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 5, 2019 12:23 AM2019-02-05T00:23:16+5:302019-02-05T00:23:29+5:30

नाशिक : केंद्रीय अर्थसंकल्पात शेतकऱ्यांना दरवर्षी सहा हजार रुपये देण्याच्या निर्णयाच्या अंमलबजावणीसाठी सरकारने शासकीय यंत्रणेला कामाला लावले असून, जिल्ह्णातील प्रत्येक खातेधारक शेतकºयांची गावपातळीवर माहिती गोळा करण्यास सुरुवात झाली आहे.

Start collecting the details of farmers' families | शेतकरी कुटुंबांची माहिती गोळा करण्यास प्रारंभ

शेतकरी कुटुंबांची माहिती गोळा करण्यास प्रारंभ

Next
ठळक मुद्दे१ फेब्रुवारीच्या खातेदारांनाच लाभ : तलाठ्यांना सूचना

नाशिक : केंद्रीय अर्थसंकल्पात शेतकऱ्यांना दरवर्षी सहा हजार रुपये देण्याच्या निर्णयाच्या अंमलबजावणीसाठी सरकारने शासकीय यंत्रणेला कामाला लावले असून, जिल्ह्णातील प्रत्येक खातेधारक शेतकºयांची गावपातळीवर माहिती गोळा करण्यास सुरुवात झाली आहे.
१ फेब्रुवारी रोजी ज्याच्या नावे दोन हेक्टर इतकी जमीन असेल त्याला शेतकरी कुटुंब म्हणून संबोधले जाणार असल्याने ज्या एकत्रित कुटुंबाच्या शेताची खातेफोड झालेली नाही, त्यांना मात्र या मदतीपासून वंचित राहावे लागणार आहे.
एकत्रित जमीन असेल व खातेफोड १ फेब्रुवारी २०१९ पूर्वी झालेले नसेल असे कुटुंब कितीही आर्थिक दुर्बल असले तरी, त्यांना लाभ होणार नाही. एवढेच नव्हे तर एकाच शेतकºयाची दोन जिल्ह्णात शेती असेल तर त्याची माहिती गोळा केली जाईल. आणि क्षेत्र दोन हेक्टरपेक्षा अधिक असेल तर त्यालाही वंचित राहावे लागणार आहे. शासनाने लाभार्थी ठरविण्याचे निकष पाठविले असले तरी, जे लाभात बसत नाही अशांबाबत अद्याप कोणताही निर्णय घेण्यात आलेला नाही. त्यामुळे दोन दिवसांपूर्वी राज्याचे कृषी सचिव एकनाथ डवले यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक घेऊन शेतकºयांची माहिती कशी गोळा करायची याबाबत मार्गदर्शन केले आहे. त्यामुळे सातबारा संगणकीकरणांतर्गत महसूल विभागाकडे बºयापैकी माहिती गोळा झालेली असून, गाव नमुना आठमध्ये नमूद क्षेत्र व शेतकºयाची असलेली माहिती संकलित करण्याचे आदेश गावपातळीवर तलाठ्यांंना देण्यात आलेले आहेत. जिल्ह्णात लाखो खातेदार असले तरी, त्यातील किती शेतकºयांकडे दोन हेक्टर वा त्यापेक्षा कमी जमीन आहे हे अगोदर शोधण्यात येत असून, शासनाने लवकरात लवकर ही माहिती मागविली आहे. त्याचबरोबर शेतकºयाचे आधार, बॅँक खात्याचा क्रमांक व आयएफसी कोडदेखील गोळा करण्याच्या सूचना आहेत.

Web Title: Start collecting the details of farmers' families

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Farmerशेतकरी