ऊस उत्पादकांचे पैसे जमा करण्यास प्रारंभ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 11, 2018 12:09 AM2018-05-11T00:09:26+5:302018-05-11T00:09:26+5:30
लोहोणेर : वसंतदादा पाटील सहकारी साखर कारखान्याच्या ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या ऊस बिलाचे पैसे त्यांच्या बँक खात्यात वर्ग करण्यास सुरु वात झाली.
लोहोणेर : वसंतदादा पाटील सहकारी साखर कारखान्याच्या ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या ऊस बिलाचे पैसे त्यांच्या बँक खात्यात वर्ग करण्यास सुरु वात झाली असून, येत्या आठ दिवसात सर्व ऊस उत्पादक शेतकºयांना ऊस बिलाचे पैसे अदा केले जातील, अशी माहिती वसाकाचे मुख्य प्राधिकृत अधिकारी आमदार डॉ. राहुल अहेर यांनी दिली. याबाबत अधिक माहिती देताना अहेर म्हणाले की, मध्यंतरी साखरेचे उतरलेले बाजारभाव व साखर विक्रीबाबत शासनाचे धोरण यामुळे ऊस उत्पादक शेतकºयांना वेळेवर पैसे देता आले नाही. यामुळे ऊस उत्पादक शेतकºयांमध्ये नाराजी असणे स्वाभाविक होते; मात्र अशा कठीण परिस्थितीत ऊस उत्पादक शेतकºयांनी वसाका व्यवस्थापनावर विश्वास ठेवून सहकार्य केल्याबद्दल आभार मानले.