सुकेणे महाविद्यालयाच्या श्रमसंस्कार शिबिरास प्रारंभ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 25, 2019 06:12 PM2019-12-25T18:12:06+5:302019-12-25T18:12:47+5:30

कसबे सुकेणे : मविप्र संचलित कर्मवीर रावसाहेब थोरात हायस्कूल व कला व विज्ञान कनिष्ठ महाविद्यालयाचे राष्ट्रीय सेवा योजना अंतर्गत विशेष हिवाळी श्रमसंस्कार शिबिरास सोनेवाडी (ओझर) येथे हे प्रारंभ झाला आहे.

Start the college's labor-intensive camp to dry up | सुकेणे महाविद्यालयाच्या श्रमसंस्कार शिबिरास प्रारंभ

सुकेणे महाविद्यालयाच्या श्रमसंस्कार शिबिरास प्रारंभ

Next
ठळक मुद्दे अनेक विषयांवर प्रबोधन व विविध उपक्र मांचे आयोजन करण्यात आले आहे.

कसबे सुकेणे : मविप्र संचलित कर्मवीर रावसाहेब थोरात हायस्कूल व कला व विज्ञान कनिष्ठ महाविद्यालयाचे राष्ट्रीय सेवा योजना अंतर्गत विशेष हिवाळी श्रमसंस्कार शिबिरास सोनेवाडी (ओझर) येथे हे प्रारंभ झाला आहे.
महात्मा गांधीजींच्या १५१ व्या जयंतीनिमित्त शाश्वत सर्वांगिन ग्रामविकासाचे समर्थ भारत अभियान व स्वामी विवेकानंद यांच्या सक्षम युवा समर्थ भारत या विशेष उपकार्यक्र मांतर्गत विशेष हिवाळी श्रमसंस्कार शिबिराचे आयोजन करण्यात आले. आहे या श्रमसंस्कार शिबिरात अनेक विषयांवर प्रबोधन व विविध उपक्र मांचे आयोजन करण्यात आले आहे.
त्यात जलपुनर्भरण व पाणलोट क्षेत्र, वृक्षसंवर्धन, शिवचरित्र व आजचा युवक, श्रमसंस्कार चे महत्त्व, संगीत आण िआजचे युवक ,जाती-धर्माचे वेड व युवक, युवतींचे आरोग्यविषयक समस्या व उपाय, श्रमदान एक श्रेष्ठ दान, वास्तुविशारद मधील संधी, अंधश्रद्धा व युवक योग व श्रमसंस्कार, सेंद्रिय शेती व वरदान याविषयी तज्ञांची महत्वपूर्ण व्याख्याने आयोजित केली आहे.
हे श्रमसंस्कार शिबिर यशस्वी करण्यासाठी प्राचार्य आनंद शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली प्रा. राजेंद्र धनवटे, प्रा. दिनकर रसाळ यांच्यासह विद्यालयातील प्राध्यापक, कार्यालयीन सेवक परिश्रम घेत आहेत.

(फोटो २५ शिबीर)
सोनेवाडी येथे श्रमदान करताना सुकेणे येथील थोरात महाविद्यालयातील रासेयोचे विद्यार्थी.

Web Title: Start the college's labor-intensive camp to dry up

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.