अनाधिकृत अतिक्रमणे हटविण्यास प्रारंभ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 22, 2018 12:58 PM2018-08-22T12:58:42+5:302018-08-22T12:59:17+5:30

सिन्नर : शहरातील वावी वेस ते नवापुल (जय मल्हार खाणावळ) पर्यंत रस्त्यालगत तसेच सिन्नर शहरातील मुख्य वाहतुकीच्या रस्त्यालगत बसणारे छोटे व्यावसायीक तथा ओटे, पायऱ्या व इतर (निवासी बांधकामे सोडून) विनापरवाना अनिधकृत अतिक्रमणे हटविण्याची कार्यवाही (दि.२०) रोजी नगरपरिषदेने हाती घेण्यात आली आहे.

Start deleting unauthorized encroachments | अनाधिकृत अतिक्रमणे हटविण्यास प्रारंभ

अनाधिकृत अतिक्रमणे हटविण्यास प्रारंभ

Next

सिन्नर : शहरातील वावी वेस ते नवापुल (जय मल्हार खाणावळ) पर्यंत रस्त्यालगत तसेच सिन्नर शहरातील मुख्य वाहतुकीच्या रस्त्यालगत बसणारे छोटे व्यावसायीक तथा ओटे, पायऱ्या व इतर (निवासी बांधकामे सोडून) विनापरवाना अनिधकृत अतिक्रमणे हटविण्याची कार्यवाही (दि.२०) रोजी नगरपरिषदेने हाती घेण्यात आली आहे. नगरपरिषदचे मुख्याधिकारी व्यंकटेश दुर्वास यांचे मार्गदर्शनाखाली अतिक्रमण निर्मुलन अधिकारी निलेश बाविस्कर, नगरपरिषद अभियंता जनार्दन फुलारी व अतिक्र मण निर्मुलन पथक यांनी गणेश पेठ भागात अतिक्रमण निर्मुलन मोहिमेमध्ये सहभाग घेतला. नगरपरिषदेने अतिक्रमण मोहिम मोठ्या प्रमाणात हाती घेतली असून त्यामुळे शहरातील नागरिक समाधान व्यक्त करीत आहे. शहरातील मुख्य रस्त्यालगत भूमीगत गटारीचे कामे तथा रस्ते डांबरीकरण व कॉँक्रीटीकरणाची कामे नव्याने घेण्यात येत आहे. शहरातील वाहतुकीचे सुयोग्य नियोजन करण्यासाठी जेष्ठ पत्रकार अरविंद गुजराथी यांनी मागणी केल्याप्रमाणे नगरपरिषदेने वाहतुक आराखडा तयार केला आहे. त्याची काटेकोर अंमलबजावणी करण्याची कार्यवाही नगरपरिषद व पोलिस प्रशासन यांच्यामार्फत करण्यात येणार आहे. शहरात मुख्य बाजारपेठ भागात होणारी वाहतुकीची कोंडी पाहता लहान मुले, वृध्द, महिला यांना पायी चालण्यास अडथळा निर्माण होतो. यापूर्वी शहरात दुचाकी व चारचाकीद्वारे बºयाच दुर्घटना घडलेल्या आहे. नगरपरिषदेने यापूर्वी सर्व व्यापारी, व्यावसायीक यांची बैठक घेवून त्याबाबत सुचना दिलेल्या आहे. संबधितांना महाराष्ट्र प्रादेशिक नगररचना अधिनियम १९६६ अन्वये वेळोवेळी नोटिसा देण्यात आलेल्या आहे.रस्त्यावरील अतिक्रमण काढुन घेण्याबाबत ध्वनी क्षेपावरून सुचनाही देण्यात आलेल्या आहे. शहरातील व्यापारी, व्यावसायीक यांनी आपल्या दुकानासमोरील पक्के ओटे, टपरी, पायºया स्वत: काढुन घ्याव्या अन्यथा नगरपरिषदेद्वारे अतिक्रण निर्मुलन मोहिमे दरम्यान काढुन घेण्यात येतील. अन्यथा कायदेशीर कार्यवाही करण्यात येईल असे आवाहन नगरपरिषद मुख्याधिकारी दुर्वास, अतिक्रमण निर्मुलन अधिकारी बाविस्कर यांनी केली आहे.

Web Title: Start deleting unauthorized encroachments

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Nashikनाशिक