गोंदे फाटा येथे डांबरीकरणास अखेर प्रांरभ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 26, 2019 04:12 PM2019-08-26T16:12:34+5:302019-08-26T16:12:43+5:30
नांदूरवैद्य : गोंदे फाटा येथील राष्टÑीय महामार्गावर झालेल्या खडड्यांच्या दुरूस्तीला व डांबरीकरणाला प्रारंभ झाला असल्याने नागरिकांना दिलासा मिळाला आहे.
नांदूरवैद्य : गोंदे फाटा येथील राष्टÑीय महामार्गावर झालेल्या खडड्यांच्या दुरूस्तीला व डांबरीकरणाला प्रारंभ झाला असल्याने नागरिकांना दिलासा मिळाला आहे. याबाबत सार्वजनिक बांधकाम विभागाने तातडीने दखल घेतली आहे.
अनेक गावांना शहरांशी जोडणा-या नाशिक - मुंबई या राष्ट्रीय महामार्गावरील गोंदे फाटा येथे यावर्षी सततच्या सुरू असलेल्या संततधारेमुळे येथील महामार्गाला मोठमोठे खड्डे पडल्याने या महामार्गाची अतिशय दयनीय अवस्था झाली असून छोट्या मोठ्या अपघातांत वाढ होत आहे. नाशिक - मुंबई या राष्ट्रीय महामार्गावरील गोंदे फाटा येथे जागोजागी मोठमोठे खड्डे पडले असल्याने या महामार्गाची अवस्था अतिशय बिकट झाली आहे.दररोज हजारो वाहनांची यावरून वाहतूक होत असते.त्यामुळे नोकरी, शिक्षण, व्यवसायाच्या निमित्ताने नागरिक याच महामार्गाने प्रवास करत शहरात दाखल होत असतात.माञ सध्या या महामार्गावरील गोंदे फाटा येथे खड्डेच खड्डे झाल्याने प्रवाशांना हा नक्की " महामार्ग आहे की खड्डेमार्ग " असा प्रश्न पडतो आहे.राष्ट्रीय महामार्ग क्र मांक तीन हा नाशिकहून मुंबईकडे जातो.त्यामुळे दररोज येथून हजारो वाहनांची प्रवाशी मालवाहतूक होत असते.माञ यंदाच्या पावसाळ्यात या महामार्गावर ठिकठिकाणी खड्डे झाल्याने वाहनधारकांना चांगलीच कसरत करावी लागत असल्याने या महामार्गावरील खड्डे त्वरीत बुजवण्यात यावे अशी जोरदार मागणी येथील वाहनधारकांनी केली होती.