देवमामलेदार यात्रोत्सवाला प्रारंभ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 1, 2019 11:12 PM2019-01-01T23:12:32+5:302019-01-01T23:13:31+5:30

सटाणा : शहराचे ग्रामदैवत देवमामलेदार श्री यशवंतराव महाराजांच्या पुण्यतिथी निमित्त यात्रोत्सवास मंगळवारपासून विविध कार्यक्र मांनी उत्साहात प्रारंभ झाला.

Start of Devamamladar Yatra | देवमामलेदार यात्रोत्सवाला प्रारंभ

सटाणा येथिल देव मामलेदार यशवंतराव महाराजांचा यात्रा उत्सव मंगळवार पासुन सुरु पहाटे महाराजांची सहपत्नीक महापुजा करतांना तहसिलदार प्रमोद हीले, नगराध्यक्ष सुनिल मोरे, ट्रस्टचे अध्यक्ष भालचंद्र बागड, ट्रस्ट्री राजेंद्र भांगडीया समवेत सटाण्याच्या प्रभारी पोलीस अधिकारी सोनाली कदम, नगरसेविका डॉ. विद्या सोनवणे आदि.

googlenewsNext
ठळक मुद्देरथ मिरवणूक उत्साहात .....

सटाणा : शहराचे ग्रामदैवत देवमामलेदार श्री यशवंतराव महाराजांच्या पुण्यतिथी निमित्त यात्रोत्सवास मंगळवारपासून विविध कार्यक्र मांनी उत्साहात प्रारंभ झाला.
पहाटे चार वाजता बागलाणचे तहसीलदार प्रमोद हिले व पालिकेच्या मुख्याधिकारी सौ.हेमलता हिले-डगळे , देवस्थानचे अध्यक्ष भालचंद्र बागड व सौ.अरु णा बागड, नगराध्यक्ष सुनील मोरे व सौ.योगिता मोरे, यांच्या हस्तेदेवमामलेदार श्री यशवंतराव महाराजांच्या मूर्तीचा अभिषेक व महाआरती करण्यात आली.पहाटे तीन वाजेपासूनच आरमतीरावरील देवमामलेदारांच्या मंदिरात भारु डे, भजने आदी कार्यक्र मांचे आयोजन केले होते. पहाटेच्या निरव शांततेत ध्वनिक्षेपकावरून वाजविण्यात येणार्या शहनाई व सनई चौघड्यामुळे शहरात भक्तीमय वातावरण निर्माण झाले होते. पहाटे बागलाणचे तहसीलदार प्रमोद हिले, देवस्थानचे अध्यक्ष भालचंद्र बागड, नगराध्यक्ष सुनील मोरे यांच्या सपत्नीक हस्ते महापूजेस सुरु वात झाली. महापूजेसाठी आबालवृद्धांनी गर्दी केली होती. महापूजेचे पौरोहित्य राजेंद्र कुलकर्णी, परिमल जोशी, मकरंद पाठक, संजय चंद्रात्रे प्रा.धनंजय पंडित, संजय चंद्रात्रे, पियुष गोसावी, आबा मुळे, पंकज इनामदार, बाळ पाठक, विनायक कुलकर्णी, रोहित देशपांडे आदींनी केले.
, बबन मुळे, भास्कर जोशी, गजानन जोशी, अभय चंद्रात्रे, कौस्तुभ पिसोळकर, ऋषी चंद्रात्रे शरद गुरव आण िपप्पू गुरव यांनी सनई चौघड्याचे वादन केले. तहसील कार्यालयातील देवमामलेदार श्री यशवंतराव महाराजांनी ज्या खुर्चीवर बसून जनतेची सेवा केली, त्या खुर्चीची पूजा आज सकाळी प्रभारी तहसीलदार दीपक धिवरे व सौ.स्नेहा धिवरे यांच्या हस्ते करण्यात आली. पोलीस ठाण्याच्या आवारात उभारण्यात आलेल्या देवमामलेदारांच्या मंदिरात पहाटे चार वाजता सालाबादाप्रमाणे कॉंग्रेसचे शहराध्यक्ष किशोर कदम, भारती कदम, राजेश भोपळे, श्रद्धा भोपळे, पोलीस हवालदार जिभाऊ पवार व उषा पवार यांच्या हस्ते महाराजांच्या मूर्तीचा अभिषेक व महाआरती करण्यात आली. तुषार कुलकर्णी यांनी पौरोहित्य केले.यावेळी प्रशिक्षणार्थी पोलीस उपअधीक्षक सोनाली कदम , सहायक पोलीस निरीक्षक देवेंद्र शिंदे आदी उपस्थित होते. यांच्या सपत्नीक हस्ते महाराजांच्या रथमिरवणुकीस सुरु वात होणार आहे. (०१ सटाणा १)
रथ मिरवणूक उत्साहात .....
महाराजांच्या यात्रोत्सवानिमित्त आज सायंकाळी पाच वाजता मालेगाव ग्रामीणचे सहाय्यक पोलीस उपअधीक्षक शशिकांत शिंदे,प्रांत प्रवीण महाजन यांच्या हस्ते सपत्नीक रथाचे पूजन करण्यात आले.त्यानंतर महापुजेचे मानकरी प्रभारी तहसीलदार प्रमोद हिले ,जायखेडा पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक गणेश गुरव शिक्षणार्थी पोलीस उपअधीक्षक सोनाली कदम ,नगराध्यक्ष सुनील मोरे ,देवस्थानचे अध्यक्ष भालचंद्र बागड ,सहायक पोलीस निरीक्षक देवेंद्र शिंदे,देवस्थानचे विश्वस्त रमेश देवरे ,विजय पाटील ,हेमंत सोनवणे ,राजेंद्र येवला यांच्या हस्ते रथ ओढून चावडी रोडने रथ मिरवणुकीला प्रारंभ करण्यात आला.मुंबई येथील भांगडा नृत्य पथक लेझीम पथक,टिपरी पथक,आदिवासी नृत्य सादर करत ढोलताशाच्या गजरात कॅप्टन अनिल पवार चौक मार्गाने सरकारी दवाखाना,शिवाजी चौक,टीडीए रोड,मल्हार रोडवरून पोलीस चौकी मार्गे सोनार गल्ली ,महालक्ष्मी मंदिर मार्गाने रथ यात्रा काढण्यात आली . रथ मार्गावर ठिकठिकाणी महिलांनी सडा आण िरांगोळ्या घालून सजवला होता.तर मिरवणुकी दरम्यान भाविकांसाठी विविध सामाजिक संघटना व कार्यकर्त्यांनी पाण्याची व प्रसादाची व्यवस्था केली होती.दरम्यान मुंबई येथील भांगडा नृत्य पथक व नंदुरबार येथील आदिवासी नृत्य पथक रथ मिरवणुकीचे खास आकर्षण ठरले.



 


 

Web Title: Start of Devamamladar Yatra

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Devaदेवा