वटार येथे डोंगऱ्यादेव उत्सवाला प्रारंभ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 19, 2018 05:35 PM2018-12-19T17:35:44+5:302018-12-19T17:40:17+5:30
वटार : आदिवासी बांधवाचे कडक व्रत असलेल्या डोंगरदेव या उत्सवात सुरुवात झाल्याने या भागात अतिशय मंगलमय वातावरण निर्माण झाले आहे. सदर उत्सव पंधरा दिवस चालतो.
वटार : आदिवासी बांधवाचे कडक व्रत असलेल्या डोंगरदेव या उत्सवात सुरुवात झाल्याने या भागात अतिशय मंगलमय वातावरण निर्माण झाले आहे. सदर उत्सव पंधरा दिवस चालतो.
हा उत्सव मार्गशीष महिन्यात येतो. त्यावेळेस कडक हिवाळा असतो. हा उत्सव आदिवासी वस्तीच्या मघ्यभागी उघड्यावर केला जातो. तेथे बाबू किंवा काठी उभे करून कुंपण केले जाते. यात एक प्रवेश द्वार असते. याला आदिवाशी बांधव खळी असे मानतात. या खळीच्या मघ्यभागी मांडव टाकला जातो. या मांडवाच्या मघ्यभागी देवदाडा उभा करून त्यास झेंडूच्या फुलाच्या माळा बांधल्या जातात.
चौकट.....रात्री या ठिकाणी रात्रभर जागरण करून आदी लयबद्ध नाचतात. या उत्सवात रात्री देवदेवतांचे कथाकथन केले जाते. त्यासाठी थाळी लावण्यात येते. थाळी म्हणजे कासाच्या मोठ्या ताटात डांबर लावून मघ्यभागी कुरसाणीच्या झाडाची काठी लावली जाते. या काडीवर जोरात हात वरून खाली ओढल्यावर लयबद्ध असा आवाज येतो. याला ग्रामीण भागात थाळकर मनतात. हा देवदेवताच्या कथा या थाळीच्या लयबद्ध आवाजात सांगतो त्यास साथ दोन माणसे देतात. या कार्यक्र मासाठी उपस्थित असलेल्या लोकांना सांगतात.
या उत्सावात सहभागी झालेल्या व्यक्ती भाया म्हणून संबोधले जाते. या उत्सवातील लोकांना पहाटे लवकर उठून थंड पाण्याने अंघोळ कारावी लागते. हे दिवसभर परिसरातील गावागावात जावून घरासमोर डोंगºयादेवाच्या नावाचा गोल फेरा धरून नाचतात म्हणून शेतकरी यांना शिधा म्हणून धान्य देतात. दिवसभर उपवास असल्याने काही शेतकरी यांना गुळ-शेंगदाणे देतात. दिवसभर फिरून झाल्यावर रात्री पुन्हा आपल्या खळीवर येतात. हा उत्सव पंधरा दिवसाच्या असतो. या देवाचे व्रत करणाºयांना व सर्व भाविकांना रात्री मक्याची कोंडी, बिगर तेलाची भाजी, ज्वारी किंवा नागलीची भाकरी प्रसाद म्हणून खायला देतात.
या उत्सवाची सांगता मार्गशीष महिन्याच्या पैर्णिमाला होते. पोर्णिमेच्या आदल्या दिवशी रात्री डोंगरातील देवतेच्या ठिकाणी गड घेण्यासाठी जातात. या ठिकाणी रात्री कोंबडा सोडला जातो. ज्या ठिकाणी गड असतो. तेथील गुहेला रात्री बांबूच्या काठ्या लावल्या जातात. पोर्णिमेच्या दिवशी तेथील गुहा उघडली जाते. तेव्हा या डोंगºयादेव उत्सवातील पाच भाया आत मघ्ये जाऊन तेथील देवताचे पूजन करून गडामघुन पाण्याचा हंडा भरून आणतात. जर व्रताचा नियम चूकला तर या मघ्ये गेलेल्या पाच भाया गडा दरवाजा बंद होऊन मघ्ये अटकल्या जातात. तेव्हा पुन्हा तिसºया वर्षी हा उत्सव केल्यावर त्या वेळेस परत जीवंत निघतात अशी या व्रताची आख्यायिका आहे.
या नंतर गावातील सर्व लोकांकरीता महाप्रसादाचा कार्यक्र म असतो.
आमच्या येथे हा ‘डोंगºयादेव उत्सव’ वडिलोपार्जित आहे. या व्रताच्या कालावधीत घरात प्रवेश करीत नाही. शिव ओलांडत नाही. पंधरा दिवस कडक उपवास करावा लागतो. भूतलावरील वनस्पती, वन्यजीव यांचे संरक्षण संवर्धन व्हावे, मानवजातीचे कल्याण व्हावे, या गावातील वस्तीतील सर्व लोकांचे आरोग्य, सुखसंपदेची भरभराट व्हावी, व सर्व लोक सुख सस्मृध्दीने नंदावते म्हणून हे व्रत दर तीन वर्षांनी केले जाते.
- तात्याभाऊ सोनवणे.