दोडीत म्हाळोबा यात्रोत्सवास प्रारंभ

By admin | Published: February 21, 2016 09:44 PM2016-02-21T21:44:07+5:302016-02-21T21:47:51+5:30

मुखवटा मिरवणूक : कावडीधारकांकडून गंगेच्या पाण्याने महाराजांचे अभ्यंगस्नान

Start of Dosti Mhaloba Yatra | दोडीत म्हाळोबा यात्रोत्सवास प्रारंभ

दोडीत म्हाळोबा यात्रोत्सवास प्रारंभ

Next

 नांदूरशिंगोटे : सिन्नर तालुक्यातील दोडी बुद्रुक येथील धनगर समाजाचे कुलदैवत व परिसरातील जागृत देवस्थान असलेल्या म्हाळोबा महाराज यात्रेस उत्साहात प्रारंभ झाला. यात्रेच्या पहिल्या दिवशी स्थानिक भक्त परिवाराकडून ४०० च्या आसपास बोकडांचा नवसपूर्तीसाठी बळी देण्यात आला.
राज्यातील धनगर समाजाचे आराध्यदैवत म्हाळोबा महाराज यात्रा तीन दिवस चालणार आहे. यात्रोत्सवाला राज्यभरातून लाखो भाविक हजेरी लावतात. यात्रेच्या रविवारी सकाळी आठ वाजता कावडीद्वारे आणलेले गंगेचे पाणी व पंचामृताने म्हाळोबा महाराज मूर्तीस स्नान घालून विधिवत पूजन करण्यात आले. पालखीतून देवाचा मुखवटा, पादुका व काठ्यांची गावातून मिरवणूक काढण्यात आली. भाविकांच्या खांद्यावर रंगीबेरंगी काठीमहाल सजवून धनगरी ढोलांचा गजर व सनईच्या सुरात म्हाळोबा मंदिरापासून मिरवणुकीस प्रारंभ झाला. मिरवणूक दोडी बुद्रुक गावात येताच फटाक्यांची आतषबाजी करण्यात आली. त्यानंतर चौकाचौकात महिलांनी मुखवटा व काठीमहालाचे पूजन केले. सुमारे चार तास चालेल्या मिरवणुकीत धनगर समाजाबरोबरच गावातील आबालवृद्धांसह महिला व तरुण मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. म्हाळोबा महाराजांची विधिवत पूजा करून मंदिरात मुखवट्याची स्थापना करण्यात आली. सायंकाळपर्यंत स्थानिक भगत मंडळींकडून सुमारे ४०० बोकडांचा बळी देण्यात आला. यावेळी म्हाळोबा महाराजांना नैवेद्य दाखविण्यात आला.
बोकडबळीसाठी म्हाळोबा महाराज यात्रा राज्यभर प्रसिद्ध आहे. यात्रेच्या दुसऱ्या दिवशी वर्षभर कबूल केलेले नवस फेडण्यासाठी भाविक दाखल होणार आहेत. मंदिरास रंगरंगोटी, आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली आहे. बाहेरगावाहून आलेल्या काठ्यांची भव्य मिरवणूक काढून त्यांची देवभेट घडविली जाते. बोकडबळी वधगृहातच देण्याचे आदेश पोलिसांनी दिलेले आहेत. मंदिर परिसरात अडथळे निर्माण केले असून, दर्शन रांगा तयार करण्यात आल्या आहेत. आरोग्य विभागाच्या वतीने रुग्णवाहिका व आरोग्य कर्मचारी तैनात करण्यात आले आहेत.

Web Title: Start of Dosti Mhaloba Yatra

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.