प्राध्यापक , विद्यार्थी यांनी रेखाटलेल्या  चित्रशैली प्रदर्शनास प्रारंभ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 28, 2018 01:03 AM2018-04-28T01:03:45+5:302018-04-28T01:03:45+5:30

क. का. वाघ ललितकला महाविद्यालयातील प्राध्यापक व विद्यार्थी यांनी रेखाटलेल्या न्यूड चित्रशैली चित्रांच्या प्रदर्शनास गंगापूररोडवरील हार्मनी आर्ट गॅलरीत शुक्रवारी (दि. २७) दिमाखात प्रारंभ झाला.

 Start of exhibition portrayal by professor, student | प्राध्यापक , विद्यार्थी यांनी रेखाटलेल्या  चित्रशैली प्रदर्शनास प्रारंभ

प्राध्यापक , विद्यार्थी यांनी रेखाटलेल्या  चित्रशैली प्रदर्शनास प्रारंभ

googlenewsNext

नाशिक : क. का. वाघ ललितकला महाविद्यालयातील प्राध्यापक व विद्यार्थी यांनी रेखाटलेल्या न्यूड चित्रशैली चित्रांच्या प्रदर्शनास गंगापूररोडवरील हार्मनी आर्ट गॅलरीत शुक्रवारी (दि. २७) दिमाखात प्रारंभ झाला.  प्रदर्शनाचे उद्घाटन दिग्दर्शक-अभिनेते सचिन शिंदे, लेखक-साहित्यिक दत्ता पाटील आदी मान्यवरांच्या हस्ते झाले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी अजिंक्य वाघ होते. प्रदर्शनात प्रा. संजय दुर्गावाड, प्रा. गोकुळ सूर्यवंशी, प्रा. माधुरी गायधनी, प्रा. बाळ नगरकर, प्रा. नयन नगरकर, प्रा. शैलेश गौतम, ऋषिकेश भंडारी, के. टी. भाग्यश्री, अजिंक्य शिरोडकर, शिवानी पवार, वैष्णवी कोढीकर, रोहिणी शर्मा, कलावती भालेराव, मयूरी जोशी, भावना तोरणे, किरण गुंजाळ, हर्षदा म्हस्के यांची न्यूड चित्रशैलीत रेखाटलेली सुंदर चित्रे मांडण्यात आली आहेत, तर प्रा. योगेश गटकळ, प्रा. भूषण कोंबडे, प्रा. प्रति लाल, निरंजन मारकंडवार, किरण आंबेकर, गणेश शेखरे, श्रीपाद भालेराव, सागर शिरसाठ, भगवान रामपुरे यांची शिल्पे मांडण्यात आली आहेत.  बाळ नगरकर यांनी सूत्रसंचालन केले. याप्रसंगी सहभागी चित्रकार, रसिक प्रेक्षक मोठ्या संख्येने उपस्थित होते. मंगळवारी (दि. १) रात्रीपर्यंत प्रदर्शन सर्व चित्रकला प्रेमींसाठी खुले असणार आहे.
न्यूड हे व्हल्गर नाही : शिंदे
मनोगत व्यक्त करताना सचिन शिंदे म्हणाले की, न्यूड हे व्हल्गर नाही. त्यात अश्लीलता नाही. कलेच्या नजरेने याकडे बघावे. त्या नजरेने पाहाल तर जीवनाचे एक वेगळेच अंग तुम्हाला जाणवेल. त्यामुळे अशा वेगळ्या धाटणीच्या प्रदर्शनाचे रसग्रहण करावे, असे आवाहनही त्यांनी यावेळी केले.

Web Title:  Start of exhibition portrayal by professor, student

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Nashikनाशिक