पाथरेत नदीपात्रातील गाळ काढण्यास प्रारंभ
By admin | Published: February 29, 2016 10:43 PM2016-02-29T22:43:13+5:302016-02-29T22:43:41+5:30
पाथरेत नदीपात्रातील गाळ काढण्यास प्रारंभ
पाथरे : सिन्नर तालुक्यातील पाथरे बुद्रूक येथे जलयुक्त शिवार अभियानांतर्गत जांब व गौवळण या नद्यांच्या संगमापासून सार्वजनिक विहिरीपर्यंत नदीपात्रातील गाळ काढण्याच्या कामास प्रारंभ करण्यात आला आहे.
सरपंच मच्छिंद्र चिने यांच्या हस्ते कामाचा शुभारंभ करण्यात आला. याप्रसंगी अमोल दवंगे, अनिल चिने, भाऊसाहेब चिने, केशव चिने, ज्ञानदेव घोलप, दत्तात्रय सातव, संतोष सातव, सुधाकर माळी, बाबासाहेब वाणी, रामनाथ बुचकुले,अनिल नरोडे, दिगंबर सुडके आदिंसह ग्रामस्थ उपस्थित होते. गाळ काढल्यामुळे बंधाऱ्याच्या रुंदी व खोलीसह पाणीसाठ्यातही वाढ होणार असल्याचे चिने यांनी सांगितले. दोन्ही नद्यांचे पात्रही पूर्ववत होणार असल्याचे ते म्हणाले. जलयुक्त शिवार अभियानात पाथरे गावाचा समावेश करण्यात आल्याने गाळ उपसण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांकडून जेसीबी उपलब्ध झाले आहे. त्याद्वारे गौवळण नदी, स्मशानभूमी शेजारील बंधारा येथील गाळ काढण्यात
येणार आहे. त्यामुळे परिसरातील विहिरी, हातपंप, शेती यांना
लाभ होणार असल्याचे चिने यांनी सांगितले. (वार्ताहर)
’ नाशिक : गंगापूर रोडवरील संत कबीरनगरमधील जुगार अड्ड्यावर गंगापूर पोलिसांनी शनिवारी (दि़२७) दुपारी छापा टाकला़ यावेळी जुगार खेळणारे संशयित अशोक निंबाजी गायकवाडसह दोघा जुगाऱ्यांना पोलिसांनी ताब्यात घेऊन त्यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे़