करंजगाव नदीपात्रातील पानवेली काढण्यास प्रारंभ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 2, 2021 23:21 IST2021-08-02T23:06:52+5:302021-08-02T23:21:38+5:30

सायखेडा : निफाड तालुक्यातील करंजगाव-कोठुरे पुलाला गोदावरी नदीपात्रात अडकलेल्या पानवेली जेसीबीच्या साहाय्याने काढण्यास पाटबंधारे विभागाने प्रारंभ केला आहे. खंडू बोडके-पाटील यांनी त्याबाबत पाटबंधारे विभागाच्या अधिकाऱ्यांकडे व जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांच्याकडे सातत्याने पाठपुरावा केला होता.

Start of extracting Panveli from Karanjgaon river basin | करंजगाव नदीपात्रातील पानवेली काढण्यास प्रारंभ

करंजगाव येथील गोदावरी नदीवरील पुलाच्या अडकलेल्या पानवेली जेसीबीने काढण्यात येत आहेत.

ठळक मुद्देसमाधान : जिल्हाधिकाऱ्यांकडे केली होती तक्रार

सायखेडा : निफाड तालुक्यातील करंजगाव-कोठुरे पुलाला गोदावरी नदीपात्रात अडकलेल्या पानवेली जेसीबीच्या साहाय्याने काढण्यास पाटबंधारे विभागाने प्रारंभ केला आहे. खंडू बोडके-पाटील यांनी त्याबाबत पाटबंधारे विभागाच्या अधिकाऱ्यांकडे व जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांच्याकडे सातत्याने पाठपुरावा केला होता.

पानवेली व केमिकलयुक्त रसायने सोडल्यामुळे गत आठवड्यात कोठुरे येथे मासे मृत आढळले होते. तसेच पानवेलीमुळे गोदाकाठच्या सर्वच गावांतील ग्रामस्थांचे आरोग्य धोक्यात आले होते. त्यातच भर म्हणून गंगापूर धरणातून गोदावरी नदीत सोडलेल्या विसर्गामुळे करंजगाव पूल व सायखेडा पुलाला धोका निर्माण झाला होता. त्याबाबत पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता सागर शिंदे यांच्याकडे तक्रार करत तातडीने पानवेली काढण्यास भाग पाडण्यात आले.
टाळे लावा आंदोलनाच्या इशाऱ्यानंतर सायखेडा ते चेहडी या गोदावरी नदीपात्रातील पानवेली काढण्याचे काम २९ मार्चपासून सुरू होते. मात्र बोटींच्या व अपुऱ्या मनुष्यबळाच्या साहाय्याने हे काम साडेतीन महिन्यांपासून अतिशय संथ गतीने सुरू होते. जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांच्याकडे तक्रार करताच पाटबंधारे विभागाने या कामाला गती दिली. सुमारे सहा ते सात किलोमीटर पसरलेल्या गोदावरी पात्रातील पानवेली काढण्यास पाटबंधारे विभागाला यश आले. मात्र सायखेडा व करंजगाव पुलावरील अजूनही एक ते दीड किमी पानवेली शिल्लक असून जेसीबीच्या साहाय्याने या पानवेली काढण्यात येत आहेत.

गोदावरी नदीपात्रात नाशिक महानगरपालिका क्षेत्रातून दरवर्षी पानवेली वाहून येतात. त्यामुळे गोदाकाठच्या नागरिकांचे आरोग्य धोक्यात येते. पानवेली काढण्याबाबत सात्यत्याने पाठपुरावा करावा लागतो. पाटबंधारे विभागाने त्यावर कायमस्वरूपी निधीची तरतूद करून गोदाकाठच्या नागरिकांच्या आरोग्याशी खेळू नये.
- खंडू बोडके-पाटील, माजी सरपंच, करंजगाव
 

Web Title: Start of extracting Panveli from Karanjgaon river basin

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.