न्देश महोत्सवाला प्रारंभ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 29, 2017 12:24 AM2017-12-29T00:24:20+5:302017-12-29T00:27:31+5:30
सिडको : खान्देशी संस्कृतीची ओळख आजच्या पिढीला व्हावी तसेच अहिराणी संस्कृतीचे जतन व्हावे या उद्देशाने आयोजित करण्यात आलेल्या खान्देश महोत्सवाचे गुरुवारी (दि. २८) ठक्कर डोम येथे मान्यवरांच्या हस्ते मोठ्या दिमाखात उद्घाटन करण्यात आले.
सलग चार दिवस आयोजित करण्यात आलेल्या या महोत्सवात खान्देशी संस्कृतीचे दर्शन होण्याबरोबरच खान्देशी सांस्कृतिक आणि साहित्यिक कार्यक्रमांचेदेखील आयोजन करण्यात आले आहे. आमदार सीमा हिरे यांच्या संकल्पनेतून आयोजित करण्यात आलेल्या या महोत्सवाच्या उद्घाटनाप्रसंगी आमदार हिरे यांनी खान्देशी संस्कृती, कला, साहित्य, खाद्यपदार्थ तसेच तेथील सांस्कृतिक महोत्सवास व्यासपीठ मिळवून देण्याच्या उद्देशाने या महोत्सवाचे आयोजन करण्यात आल्याची माहिती यावेळी दिली. नोकरी तसेच व्यवसायानिमित्त जळगाव, धुळे, नंदुरबार आदी भागातून नागरिक मोठ्या संख्येने नाशिकमध्ये स्थायिक झाले असून, त्यांच्या भावी पिढीला अहिराणी भाषेचा गोडवा तसेच खान्देशी संस्कृतीची ओळख या महोत्सवानिमित्त होणार असल्याचेही आमदार हिरे यांनी यावेळी सांगितले.
यावेळी शोभायात्रेत सहभागी आदिवासी टिपरी नृत्य, वाघ्या मुरळी, संबळ पथक यांनी उपस्थितांचे लक्ष वेधले. यावेळी ज्येष्ठ कवियत्री बहिणाबाई चौधरी यांच्या पुतळ्यास आणि कानबाई देवीच्या मूर्तीला पुष्पहार अर्पण करून या महोत्सवाचे उद्घाटन करण्यात आले.
उद्घाटनप्रसंगी महापौर रंजना भानसी, आमदार प्रा. देवयानी फरांदे, आमदार अनिल कदम, आमदार दीपिका चव्हाण, सुनील बागुल आदींनी आपल्या मनोगतातून खान्देशी बांधवांना शुभेच्छा दिल्या. या महोत्सवास प्रतापदादा सोनवणे, राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते नाना महाले, दत्ता पाटील, जगन पाटील, संजय न्याहारकर, जिल्हा परिषद आरोग्य सभापती यतिन पगार, बांधकाम सभापती मनीषा पवार, नगरसेवक माधुरी बोलकर, भाग्यश्री ढोमसे, प्रतिभा पवार, कावेरी घुगे, पुष्पा आव्हाड, अलका अहिरे, सुप्रिया खोडे, छाया देवांग, पल्लवी पाटील, दीपाली कुलकर्णी, प्रियंका घाटे, हिमगौरी अहेर, सीमा निगळ, सतिश सोनवणे, भगवान दोंदे, दिलीप दातीर, नीलेश ठाकरे, योगेश हिरे उपस्थित होते.सकाळी जुने सिडको परिसरातील राणाप्रताप चौक येथून भव्य शोभायात्रा काढून या महोत्सवाला औपचारिक सुरुवात करण्यात आली. या शोभायात्रेत संबळ पथक, लेजीम पथक, आदिवासी नृत्य, टिपरी नृत्य, कानबाई उत्सव देखावा, ढोल पथक आदींचा समावेश होता. राणाप्रताप चौक येथून सुरू झालेली ही शोभायात्रा विजयनगर, तोरणानगर, पवननगर, सावतानगर, त्रिमूर्ती चौक, उंटवाडी या परिसरातून काढण्यात येऊन या शोभायात्रेचा ठक्कर डोम येथे समारोप करण्यात आला.