दक्षता : धोकादायक घरांना नोटिसा देण्यास प्रारंभ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 15, 2020 08:05 PM2020-05-15T20:05:45+5:302020-05-15T20:06:12+5:30

नाशिक : महापालिकेच्या वतीने पावसाळा पूर्व दक्षतेचा भाग म्हणून धोकादायक घरांना नोटिसा बजावण्याचे काम सुरू झाले आहेत. सध्या महापलिकेच्या ...

Start giving notice to dangerous homes | दक्षता : धोकादायक घरांना नोटिसा देण्यास प्रारंभ

दक्षता : धोकादायक घरांना नोटिसा देण्यास प्रारंभ

Next
ठळक मुद्देघरे रिकामी करण्याचे आवाहन

नाशिक : महापालिकेच्या वतीने पावसाळा पूर्व दक्षतेचा भाग म्हणून धोकादायक घरांना नोटिसा बजावण्याचे काम सुरू झाले आहेत. सध्या महापलिकेच्या नोंदीनुसार ७२३ धोकादायक घरे आणि वाडे असले तरी ७०८ नोटिसा तयार करण्यात आल्या असून त्या विभागीय अधिकाऱ्यांमार्फत बजावण्याचे काम सुरू झाले आहे. नाशिक शहरात दर पावसाळ्यात धोकादायक घरांचा प्रश्न उभा राहातो. पावसाळ्यात नाशिक आणि पंचवटी गावठाणातील जुने वाडे भिजतात आणि त्यानंतर काही वाड्यांचा भाग कोसळतो तर काही वेळा संपूर्ण वाडेच खाली येतात. गेल्या वर्षी सुमारे पंचवीस ते तीस वाडे पडले होते आणि त्यात दोन जणांचे बळी गेले होते तर एक दोन ठिंकाणी वाडे पडल्याने संबंधीत वाड्यातील नागरीक जखमी झाले होते. त्यानंतर महापालिकेने संबधीतांना घरे रिकामी करून अन्यत्र स्थलांतरासाठी नोटिसा बजावून पोलीसांची देखील मदत घेतली होती. घर मालक आणि भाडे करू वादात अनेक धोकादायक वाड्यांचा पुनर्विकास होऊ शकला नाही. याठिकाणी क्लस्टर डेव्हलपमेंट योजना राबविण्याची तयारी असली तरी
अद्याप ती प्रशासकिय लालफितीत आहेत. गेल्या वर्षी हा प्रश्न ऐरणीवर आला असला तरी यंदा लॉक डाऊनमुळे महापालिकेचा अघात मुल्यमापन अहवाल रखडला आहे. यासंदर्भात, गेल्या आठवड्यात 'लोकमत'ने क्लस्टर वा-यावर वाडे पडण्यावर हे वृत्त देऊन प्रशासनाचे लक्ष वेधले होते.
दरम्यान आता प्रशासनाने धोकादायक वाड्यांचे सर्वेक्षण सुरू केले. त्यानुसार ७२३ धोकादायक घरे आणि वाडे आढळून आले आहेत. त्यातील निम्या मिळकती अती धोकादायक आहेत. या सर्वांना नोटिसा बजावण्यासाठी नगररचना विभागाने ७०८ नोटिसा तयार करून विभागीय अधिकाऱ्यांकडे पाठविल्या असून त्या संबंधीतांना बजवण्यास प्रारंभ झाला आहे. तथापि, यानंतर देखील नागरीक स्थलांतरीत होण्याबाबत शंका व्यक्त केली जात आहे.

Web Title: Start giving notice to dangerous homes

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.